
जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथिल तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
खर्डा प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील युवराज मारुती भोंडवे वय २८ या तरुण शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस ठाणे खर्डा येथून समजलेली महिती अशी की खबर देणारे विठ्ठल नरहरी भोंडवे, वय ६० वर्षे हे काल सकाळी ६.३० वा.चे सुमारास खबर देणार यांचे शेतातील जनावरांच्या गोठयात यांचा पुतण्या युवराज मारुती भोंडवे याने शेतातील जनावरांच्या गोठयातील पत्र्याच्या शेडच्या लाकडी वासाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली.

मयत युवराज मारुती भोंडवे यांच्या मागे वृद्घ आई, वडील, पत्नी, एक मुलगा, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. पुढील तपास पोहेकाँ आर के सय्यद हे करत आहेत.









