देशसेवा करणार्‍या सैनिकांनमुळेच आपला देश सुरक्षित – तहसीलदार योगेश चंद्रे

जामखेड येथे सैनिक हो तुमच्यासाठी….
उपक्रम उत्साहात संपन्न.

जामखेड प्रतिनिधी

ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अनेक संकटे अंगावर झेलून सैनिक आपल्या जिवाची पर्वा न करता सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावतात. त्यामुळे सैनिकांनमुळेच आपण आणि आपला देश सुरक्षित आहे. त्यामुळे सैनिका प्रति आपल्या मनात सर्वोच्च मानसन्मान असल्याने आपण आजी मजी सैनिक त्यांच्या विधवा पत्नी आणि त्यांच्या कुटुंबाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे मत जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी व्यक्त केले.

महसूल विभाग जामखेड एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह २०२३ उत्साहात साजरा होत आहे या निमित्ताने ५ ऑगस्ट रोजी” सैनिक हो तुमच्यासाठी ” उपक्रम तहसील कार्यालयात तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रशासकीय विभागाचे पदाधिकारी यांच्या समवेत मेळावा संपन्न झाला.

यावेळी प्रमुख उपस्थिती तहसीलदार योगेश चंद्रे , गटविकास अधिकारी प्रकाश पोळ दुय्यम निबंधक राहुल उगमले , कृषी विभागाचे गीते साहेब, महसूल सहाय्यक रमेश कांबळे ,माजी तालुका सैनिक संघटनेचे संस्थापक बजरंग डोके,अध्यक्ष दिनकर भोरे, रावसाहेब जाधव, किसन चिलगल, कॅप्टन लक्ष्मण भोरे, अनिल देडे, मयूर भोसले, पो. कॉ अविनाश ढेरे, आजी-माजी सैनिक व प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुढे बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की जामखेड मध्ये आजी माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तयार आहोत तसेच सर्व प्रशासकीय विभागाच्या वतीने त्यांना सहकार्य होईल सैनिकांना मदत करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. असे मनोगत तहसीलदार यांनी केले.

यावेळी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी माजी आजी सैनिकांच्या विविध अडचणी समक्ष जाणून घेऊन विचार विनिमय करून अडचणी सोडवणार आहेत तसेच संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन कार्यवाही करणार आहोत, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी आजी माजी सैनिकांनी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन करून आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here