मागिल काही दिवसांपासून रोगराईमुळे तालुक्यातील उडीद उडीद पीके धोक्यात आली आहेत. तर काही पीके जळुन चालली आहेत, त्यामुळे या उडीद पीकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगेश (दादा) आजबे व शेतकर्यांनी जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जामखेड तालुका हा उडीद पिकामध्ये खूप मोठी लागवड असणारा तालुका आहे, दरवर्षी ची परंपरा कायम ठेवत या वर्षी सुद्धा खूप शेतकऱ्यांनी उडीद या पिकाची लागवड केले ली आहे. मागील दहा दिवसांत काहीतरी रोगाला उडीद पीक बळी पडत असून बहुसंख्य शेतकऱ्यांची उडीद पिके ही जळून गेली आहेत किंवा जळण्याचा मार्गावर आहेत.
या बाबीकडे कोणाचेही लक्ष नसून आपण प्रशासनाला योग्य सूचना देऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत पोहोच करून जे काही पिके राहिली आहेत त्यांना कसे वाचवता येईल याविषयी मार्गदर्शन व्हावे आणि जळालेल्या उडीद पिकांचे पंचनामे व्हावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, हा हंगाम शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि यामध्ये निसर्गाने योग्य साथ दिली नाही किंवा पीक चांगले आले नाही तर शेतकरी हवालदिल होतो आणि नैराश्येच्या गर्तेत जातो, पिकावर खर्च तर झालेला असतो मग कर्जबाजारी व्हायची सुद्धा वेळ येते त्यामुळे आपण लक्ष घालून प्रशासनाला योग्य ते आदेश देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी चे प्रयत्न करावे आशी मागणी निवेदनाद्वारे जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे केली आहे.
निवेदन देता वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश (दादा) आजबे, श्रीराम डोके, नितीन जगताप अँड. ऋषीकेश डुचे, भाऊसाहेब डोके, विठ्ठल डोके, वाल्मिक डोके, सीताराम डोके, सागर डोके, अमोल राळेभात, हरी गर्जे, अजिनाथ सानप, अनंता राळेभात, उत्तम कारंडे, चंद्रकांत राऊत, किरण डोके, अंकुश राळेभात, बबन मुळे, गणेश काशीद ,राजेंद्र बेद्रे, विकास अडाले, मनोज जाधव, दत्ता ढवळे, बापू बहिर, नितीन राऊत आदी उपस्थित होते.