

पत्रकार सुदाम वराट यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालेय साहित्य वाटप
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथिल जेष्ठ पत्रकार व जामखेड मिडीया क्लब चे अध्यक्ष सुदाम वराट (सर) यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच साकत येथिल साकेश्वर विद्यालयातील विद्यार्थींना मोफत गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य श्रीराम मुरूमकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवान मुरूमकर, माजी चेअरमन प्रा. अरूण वराट, ज्ञानदेव मुरूमकर, केंद्रप्रमुख किसनराव वराट, महादेव वराट, नानासाहेब लहाने, पोलीस हेडकाँन्टेबल पालवे, पोलीस पाटील महादेव वराट, जामखेड मिडिया क्लबचे उपाध्यक्ष अशोक वीर, सहसचिव पप्पू सय्यद, पत्रकार अविनाश बोधले, किरण रेडे, मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, अशोक घोलप, सचिन वराट, सुलभा लवुळ, विजय हराळे, अतुल दळवी, आश्रू सरोदे, राम जावळे, भाऊसाहेब लहाने यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की स्वतासाठी काम करतात ते स्वतःपुरते रहातात मात्र समाज्यासाठी काम करतात त्यांची नावे अमर रहातात. हेच सामाजिक काम पत्रकार सुदाम वराट सर यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होणे महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आभ्यास व्यायाम व शिस्तीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. पालकांचे व शिक्षकांचे अनुकरण केले पाहिजे. जिवनात ज्यांना यश मिळाले आहे त्यांनी शिस्त व वेळेचे पालन केले आहे. तेच पालन विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे. भविष्यात चांगले अधिकारी बनायचे आसेल तर विद्यार्थ्यांनी पाचवी व आठवीच्या स्कॉलरशिप च्या पुस्तकांचा आभ्यास केला पाहिजे.

कार्यक्रमाच्या शेवटी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी सहा मुलांना शालेय गणवेश तर बारा मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच शाळेतील सर्व मुलांना जेवन देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले.





