

मोहरी खुन प्रकरणी चार आरोपींना खर्डा पोलीसांनी केली तात्काळ अटक,
आरोपींना न्यायालयाकडुन चार दिवसांची पोलीस कोठडी
जामखेड प्रतिनिधी
शेतातुन गुरे घेऊन जाण्याच्या कारणावरून तालुक्यातील मोहरी परीसरात झालेल्या भांडणात पुतण्याने चुलत्याच्या गळ्यावर कुर्हाडीने घाव घालुन खुन केला होता. या प्रकरणी एकुण चार जणांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनि महेश जानकर यांच्या पथकाने चार आरोपींना तात्काळ अटक केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

सोमवार दि ३ जुलै २०२३ रोजी जामखेड तालुक्यातील मोहरी या गावातील हाळणावर वस्ती येथिल मयत आशोक धोंडीबा हाळणावर यांना घटनेतील आरोपींनी मारहाण केली होती. या घटनेत आशोक धोंडीबा हळणावर यांचा मृत्यू झाला होता. त्या नंतर खुन करुन आरोपी घटनास्थळाहुन फरार झाले होते. या नंतर घटनास्थळी कर्जत चे पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे व खर्डा पोलीस स्टेशन सापोनी महेश जानकर यांनी भेट दिली होती. अहमदनगर चे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरै, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापोनी महेश जानकर यांनी एक पोलीस पथक तयार करून पो.ना संभाजी शेंडे, पो.कॉ शशि म्हस्के, बाळु गाडे, अशोक बडे, वैजीनाथ मिसाळ यांना आरोपींच्या शोधासाठी रवाना केले.

पोलीस पथक आरोपींचा शोध घेत आसतानाच आवघ्या काही तासातच खर्डा पोलीसांच्या पथकाने आरोपी युवराज बाबासाहेब हळणावर, दत्तात्रय बाबासाहेब हळणावर, नवनाथ सिताराम हळणावर व आप्पा नवनाथ हाळणावर सर्व रा. हाळणावर वस्ती, मोहरी ता.जामखेड आशा चार जणांना मोहरी शिवारातुन तात्काळ अटक करण्यात आली.

या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस सापोनी महेश जानकर हे करित आहेत.






