

जाटनांदूर जवळ टेम्पो आणि स्कार्पिओच्या भीषण अपघातात चार चार जण जागीच ठार
पाटोदा प्रतिनिधी
कल्याण – नगर – बीड महामार्गावरील पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनी नजीक असलेल्या जाट नांदूर घोडेवाडी या ठिकाणी आयशर टेम्पो आणि स्कार्पिओ गाडी यांचा भीषण अपघात झाला यामध्ये चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज दि २८ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कल्याण – नगर – बीड या पाटोदा तालुक्यातील महामार्गावरील जाट नांदूर नजीक असलेल्या घोडेवाडी या ठिकाणी बीडहून नगर कडे निघालेला आयशर टेम्पो आणि नगरहून गेवराई कडे निघालेली स्कार्पिओ यांच्यामध्ये भीषण अपघात झाला हा अपघात एवढा गंभीर होता की यामध्ये चार जण जागीच ठार झाले असून एका महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.

सर्व मृत हे गेवराई तालुक्यातील मारफळा या गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.







