“प्रजासत्ताक दिन” नावची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद, श्री नागेश विद्यालयाचे नाव देशपातळीवर चमकले.

जामखेड प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्था श्री नागेश विद्यालय मध्ये स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मेडल प्रमाणपत्र सन्मान वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

देशातील सर्वात मोठे मानवी रचनेतील “प्रजासत्ताक दिन “नाव रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयाने साकारले आहे. यामध्ये नागेश विद्यालयाचे 500 विद्यार्थी व कन्या विद्यालयाचे 500 विद्यार्थीनी असे 1000 विद्यार्थी व एनसीसी कॅडेट यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभाग घेतला हे नाव कलाशिक्षक तथा ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी साकारले. याची नोंद भारत सरकारच्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड घेतली आहे.

हा उपक्रम नागेश विद्यालयाचे प्राचार्य मडके बी के यांच्या मार्गदर्शक व संकल्पनेतून साकार झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे साहेब यावेळी प्रमुख उपस्थिती , नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, रा. काँ. प्रदेशाचे सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कन्या स्कूल कमिटी व कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर (आबा) राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले,विनायक राऊत, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी, ग्रामसेवक जिल्हाकार्याध्यक्ष युवराज ढेरे पाटील, केंद्रप्रमुख मुकुंद सातपुते, कृष्णाजी भोसले ,शिवाजीराव ढाळे, पर्यवेक्षक संजय हजारे, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, कॅप्टन गौतम केळकर, गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, बाबासाहेब घोलप, संतोष पवार, गोपाल बाबर शैलेंद्र मानकर, नागेश व कन्या विद्यालय सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी व एनसीसी कॅडेट उपस्थित होते.

तहसीलदार योगेश चंद्रे साहेब यांनी
रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून जामखेडच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे तसेच शाळेचे, संस्थेचे व गावाचे नाव देशपातळीवर चमकले आहे. ही बाब जामखेडकरांसाठी अभिमानास्पद आहे आसे सांगितले.

नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे यांनी मी हे रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे या शाळेतील प्राचार्य ,शिक्षक, विद्यार्थी , एनसीसी कॅडेट,नेहमीच रयत शिक्षण संस्थेचे नाव देशपातळीवर कसे येईल याचा प्रयत्न करत असतात हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये शाळेची नोंद झाली या माध्यमातून सिद्ध होते.

प्राध्यापक मधुकर (आबा) राळेभात यांनी रयत शिक्षण संस्थेचे नागेश विद्यालय चे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली याची प्रेरणा आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून मिळाली या विश्व रेकॉर्डमुळे आपल्या शाळाने देशपातळीवर नाव नोंदवले आहे मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे म्हणून मला फार कौतुक वाटत आहे. असेच नवनवीन उपक्रम यापुढे घ्यावे असे मनोगत व्यक्त केले.

रयत शिक्षण संस्थेचे नागेश विद्यालयाचे नोंद इंडिया बँक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याबद्दल कर्जत जामखेड चे आमदार रोहित (दादा) पवार यांनी विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे तर आभार प्रदर्शन शंभूलाल बडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here