माजी पंचायत समिती सदस्य अशोक गिरमे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

जामखेड (प्रतिनिधी) जामखेड शहरातील एक आदर्श व्यक्तीमत्व जामखेड पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक नागनाथ गिरमे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले असल्याची माहिती त्यांचे पुतणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल गिरमे यांनी दिली आहे.

आशोक गिरमे यांच्या छातीत दुखत आसल्याने त्यांना चार दिवसांपुर्वीच नगर येथील खाजगी हॉस्पिटलाला दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. दिवंगत अशोक गिरमे हे जामखेड शहरातील एक मनमिळाऊ व मितभाषी नेतृत्व होते. त्यांनी आपल्या काळात जामखेड ग्रामपंचायत सदस्य, जामखेड पंचायत समिती सदस्य व कडा सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद भुषविलेले होते. ते जामखेड शहरात एक आदर्श शेतकरी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण जामखेड शहरातून त्यांच्या अचानक जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here