व्हॉईस ऑफ मीडियाची पाटोदा तालुका कार्यकारिणी जाहीर

तालुकाध्यक्षपदी अविराज पवार तर उपाध्यक्षपदी यशवंत सानप, सुनील जेधे

प्रतिनिधी । बीड ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पाटोदा तालुका कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्ष म्हणून अविराज पवार तर उपाध्यक्ष म्हणून यशवंत सानप, सुनील जेधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर यांनी केली. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी यांनी शुभेच्छा देऊन स्वागत केले.

अकरा जणांच्या कार्यकारिणीत सरचिटणीसपदी अक्षय भवर, सहसरचिटणीसपदी सोमीनाथ खंडागळे, खजिनदार /कोषाध्यक्षपदी विशाल पोकळे, कार्यवाहकपदी गणेश गुजर, संघटकपदी चंद्रशेखर पवार, प्रसिद्धी प्रमुख म्हणून महेशर ताहेर शेख तर सदस्यपदी चंद्रकांत पवार, भाऊसाहेब पवार, अमोल येवले, कल्याण पवार, बाळू कुंखाले, श्रीकांत उकांडे, सुनील आढाव, बाबुराव पवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा पदाधिकार्‍यांनी स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here