हज कमिटीचे सदस्य सलीम बागवान यांचा ; लोक कल्याण समिती च्या वतीने नागरी सत्कार…

जामखेड प्रतिनिधी –

जामखेड शहरातील उर्दु अँग्लो स्कूल खर्डा रोड येथे महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे सदस्य पदी सलीम बागवान यांची निवड झाल्याबद्दल लोक कल्याण समिती , जामखेड च्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
सलीम बागवान यांचा लोक कल्याण समिती व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष हबीब मास्टर, तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.कैलास माने (सर),शेरखान भाई,कँप्टन लक्ष्मण भोरे,मौलाना खलील होते.यावेळी नगरसेवक शामीर भाई सय्यद (लोककल्याण समिति,अध्यक्ष) , उमरभाई कुरेशी,नादीर (हाजी),मुफती अजवत नगरसेवक अमित चिंतामणी,जमीरभाई सय्यद,ताहेर खान,सर्फराज पठाण ( एस् पी,जिम), जलीलभाई शेख,फहीम शेख,जब्बार शेख, अँड.जैद सय्यद,नासीर शेख,नासीर ( चाचू)सय्यद ,हनीफभाई कुरेशी,मोहसीन खान,अस्लम खान , मुस्तफ़ा शेख (मेजर),आसिफ शेख,जैद खान आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाकीर सर तर सुत्रसंचालन शिवव्याख्याते प्रा.जाकीर शेख ( सर) यांनी केले ,आभार जमीर सय्यद यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here