

अरणगाव येथिल हनुमान वस्ती या ठीकाणी 26 शेळ्यांचा मुत्यू
जामखेड (प्रतिनिधी) आरणगाव येथिल हनुमान वस्ती या ठीकाणी आसलेल्या शेतकर्यांच्या २६ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. पाण्यातुन विषबाधा झाली आसल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे.

अरणगाव येथील हनुमान वस्ती या ठीकाणी रहाणार्या शेतकरी सेजल बाबुराव पवार, बापु बाबुराव पवार, गणेश पवार, कैलास अजिनाथ मिसाळ, बंडु अभिमान मिसाळ या शेतकऱ्यांनाच्या शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या ७० शेळ्या दि २२ दुपारी अरणगाव परीसरातील हनुमान वस्ती या ठीकाणी चारण्यासाठी सोडल्या होत्या.

या नंतर काही तासातच सदर शेतकऱ्यांच्या शेळ्या व काही कर्डे आशा २६ शेळ्या वेगवेगळ्या ठिकाणी मृत अवस्थेत आढळून आल्या. या शेळ्यांचा मृत्यू या ठीकाणी आसलेले विषारी पाणी पिल्याने झाला आसल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. घटनास्थळी पंचनामा करण्यात येईल व नंतरच समजेल की या शेळ्यांचा मृत्यू नेमका कशा मुळे झाला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिली . मात्र शेळ्यांचा मृत्यू झाला आसल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आसल्याने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी आशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.







