

महापुरुषांच्या अवमान प्रकरणी जामखेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
जामखेड प्रतिनिधी (११ डिसेंबर) भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रातिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जे अवमानास्पद भाष्य केल्या प्रकरणी जामखेड येथिल राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड, बौद्ध महासभा, समस्त भिमसैनिक यांच्या वतीने आज दि. ११ रोजी पुकारलेले जामखेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जामखेडकरांनी कडकडीत बंद पाळला.

दरम्यान याच कारणाने जाहीर निषेध करण्यासाठी काल शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ रोजी ठीक सकाळी ११:३० वाजता जामखेड शहरातील खर्डा चौक येथेनिषेध सभा व जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, मोहन पवार, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, वैजीनाथ पोले, जामखेड शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, प्रा. कुंडल राळेभात, माजी ग्रामपंचायत सदस्य ईस्माईल सय्यद, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, सचिन शिंदे, विकास राळेभात, प्रशांत राळेभात, प्रकाश काळे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, उमर कुरेशी, प्रविण उगले, मनोज भोरे, महेश निमोणकर, प्राचार्य विकी घायतडक, अमोल लोहकरे, वसिम सय्यद (मंडप), पवन राळेभात, अमित जाधव, दिगंबर ढवळे, बबन तुपेरे, महेश राळेभात, नरेंद्र जाधव, प्रदीप शेटे, संभाजी राळेभात, फिरोज बागवान, दिगांबर चव्हाण, संजय डोके, गणेश हगवणे, समीर पठाण, आशोक आव्हाड, बाबा सोनवणे, कबीर घायतडक, माजी सरपंच शिवाजी ससाणे, सुरेखा सदाफुले, बबलू तुपेरे, दिपक घायतडक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आज रविवार दि ११ रोजी सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. जामखेड शहरात पुकारलेल्या या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, सह विविध संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला होता.







