अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी एक जणाविरोधात गुन्हा दाखल

जामखेड (प्रतिनिधी, ११ डिसेंबर) जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे १६ वर्षांच्या अल्पवयीन पिडीत मुलीशी लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करून दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गावातीलच आरोपी याचे विरुध्द पोक्सो अॅक्टसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आसल्याची माहिती समोर आली आहे.

या बाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील १६ वर्षे ४ महिने वयाची अल्पवयीन पिडीता आपले राहते घरासमोर बसलेली असताना या घटनेतील आरोपी याने तिच्या जवळ जावून पिडीतेच्या उजव्या हाताचे मनगट आपल्या हाताने पकडुन तीस म्हणाला की, मला तुला चिठ्ठी दयायची आहे. असे म्हणत तीच्या उजव्या हाताचे मनगट दाबुन सदर पिडीतेस लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करुन छेडछाड केली. तसेच दमदाटी करत म्हणाला की, तु जर याबाबत कोणाला याबाबत काही सांगीतले तर मी तुला जिवे मारत असतो. अशी धमकी दिली. यानुसार या घटनेतील फीर्यादी पिडीता हीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीच्या विरोधात विनयभंग व पोक्सो ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील फिर्यादी पिडीतेच्या राहते घरासमोर दि. १० डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळ च्या सुमारास घडली आहे. या बाबत पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here