

डीजेल टँकरला हुलकावणी देणार्या मोटारसायकल चालका विरोधात गुन्हा दाखल
पेट्रोल व डिझेल एकूण 22 लाखांचे झाले नुकसान
जामखेड प्रतिनिधी
जामखेड कडून खर्ड्याकडे जात असलेला पेट्रोल व डिझेलचा टँकर राजुरी गावाजवळ मोटारसायकल चालकाने हुलकावणी दिल्याने पलटी झाला. त्यामुळे या टँकर मधिल अंदाजे पेट्रोल व डिझेलचे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात मोटरसायकल चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांन कडुन मिळालेली माहिती अशी की दि 23 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास फीर्यादी संजय अश्रू दहिफळे, वय 33 वर्ष धंदा ड्रायव्हर, राहणार कारेगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर हे टँकर चालक आपला टँकर नंबर. एम. एस 16 बी. सी, 1340 मध्ये 5000 लिटर पेट्रोल व 19000 लिटर डिझेल भरून आकळणे डेपो येथून जामखेड खर्डा रोडने भूमकडे चालले होते. या वेळी राजुरी गावाजवळ समोरुन येणाऱ्या एका अज्ञात मोटरसायकल चालकाने फीर्यादीच्या टँकरला हुलकावणी दिली. त्यामुळे फिर्यादीने आपल्या टँकरचा अचानक ब्रेक दाबल्याने टँकर पलटी झाला. तसेच त्यामधील पेट्रोल डिझेल रस्त्यावर सांडले व टँकरचे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले. त्या नंतर स्थानिक नागरिकांना टँकर पलटी झाला आसल्याची बातमी कळताच नागरीकांनी हातात जे सापडेल ते घेऊन डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

या प्रकरणी टँकर चालक याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मोटरसायकल चालका विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. तागड हे करत आहेत.







