

उसाच्या ट्रॅकटरला मोटारसायकल धडकून श्रीगोंदा तालुक्यातील तिघांचा मृत्यू.
श्रीगोंदा : काष्टी गावातील तीन तरुणांचा काल दि.१३ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दौंड पाटस रस्त्यावर वायरलेस फाट्यानजीक उसाच्या ट्रॅकटरला मोटारसायकल धडकून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

ऋषिकेश महादेव मोरे (वय २६ )स्वप्निल सतिष मनुचार्य (वय२४),गणेश बापु शिंदे (वय २५) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत हे तिन्ही तरुण काष्टी गावातील बाजारतळ परिसरात राहत होते या घटनेमुळे संपूर्ण काष्टी गावावर शोककळा पसरली असून गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्राथमिक माहिती समजली आहे.

प्राथमिक समजलेली माहिती अशी की मयत झालेले तिन्ही तरुण काल रात्री दि १३ रोजी दौंड पाटस रस्त्यावरील वायरलेस फाट्या जवळुन जात होते याच दरम्यान समोर चाललेल्या उसाच्या ट्रॅकटर ला त्यांची मोटारसायकल धडकली यात त्यांचा मृत्यू झाला या अपघातामुळे पुन्हा एकदा विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कडक कारवाईचा मुद्दा समोर आला आहे.







