कौतुकास्पद : कर्जतचा आवाज घुमला इजिप्त येथील जागतिक पर्यावरण परिषदेमध्ये

कर्जत प्रतिनिधी

इजिप्त येथे संयुक्त राष्ट्र संघटना मध्ये कार्यरत असणाऱ्या दोनशे देशांचा समावेश असलेली कोपा 27 ही जागतिक पर्यावरण संदर्भात परिषद सुरू आहे. या ठिकाणी कर्जत नगरपंचायतने दोन वर्ष पर्यावरण क्षेत्रामध्ये केलेल्या कामाचा भाषणामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या उल्लेखामुळे कर्जतकरांची छाती अभिमानाने उंचावली आहे व कर्जतकरांचा आवाज आता थेट जगाच्या नकाशावर पोहोचला आहे.

इजिप्त मधील शर्म अल शेख या शहरांमध्ये सध्या दोनशे देशांचा सहभाग असलेली पर्यावरण परिषद सुरू आहे. 6 नोव्हेंबर या दिवशी ही परिषद सुरू झाली असून 18 नोव्हेंबर या दिवशी समाप्त होणार आहे. जागतिक पर्यावरणाच्या संदर्भात ही परिषद सुरू असून या ठिकाणी भारताचे वतीने प्रतिनिधित्व करणारे अधिकारी प्रवीण दराडे महाराष्ट्र शासनाने मागील दोन वर्षांपासून राज्यामध्ये माजी वसुंधरा या अभियान राबवले.

याचे सादरीकरण करताना कर्जत नगरपंचायत दोन वर्षांमध्ये पर्यावरणासाठी केलेले काम याची केस स्टडी या ठिकाणी मांडली. या परिषदेमध्ये प्रवीण दराडे यांनी केलेल्या भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शहराचा झालेला हा गौरव निश्चितच देशाचे राज्याचे आणि तालुक्याचा गौरव वाढवणारे आहे.

कर्जत शहरामध्ये पर्यावरणासाठी मागील दोन वर्षांपासून सर्वसामाजिक संघटना , नगरपंचायत चे कर्मचारी अतिशय चांगले काम करत आहे. माझी वसुंधरा अंतर्गत स्वच्छता व हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या कामाची जागतिक पर्यावरण परिषदेमध्ये दखल घेण्यात आली आहे.

कर्जत नगरपंचायत ने पर्यावरणासाठी केलेल्या कामाचा उल्लेख जागतिक पर्यावरण परिषदेमध्ये झाल्यामुळे निश्चित खूप आनंद झाला. सर्वसामाजिक संघटना नगरपंचायत सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आणि मुख्य शहरातील सर्व नागरिक यांच्या योगदानामुळे हे यश मिळाले आहे. आसे मत कर्जत नगरपंचायत चे गोविंद जाधव मुख्याधिकारी यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here