

अतिवृष्टीमुळे आष्टीसह मराठवाडय़ात दोन शेतकऱयांचीआत्महत्त्या,
बीड जिल्ह्य़ातील आष्टी व नांदेड जिल्हय़ांत खळबळ
निसर्गाचा लहरीपणा आणि ईडी सरकारचा नाकर्तेपणा शेतकऱयांच्या मुळावर उठला आहे. त्यातच संततधार पावसामुळे मराठवाडय़ात सर्वत्र पिकांची मोठी नासाडी झाली आहे. या अस्मानी आणि सुलतानी संकटात कसे जगावे अशा पेचात सापडलेल्या बीडच्या आष्टी तालुक्यातील पांढरी आणि नांदेड जिल्हय़ाच्या नायगाव बाजार तालुक्यातील नरंगल या गावांतील दोन शेतकऱयांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.



आष्टी तालुक्यातील पांढरी येथील गळफास घेतलेले दादासाहेब बाबुराव वांढरे (56) यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. मात्र अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पोरंबाळं कशी जगावायची या चिंतेत असलेल्या दादासाहेब वांढरे यांनी आज रविवारी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने बीड जिल्हा हादरला आहे.

दुसऱया घटनेत नांदेड जिह्यातील नायगाव बाजार तालुक्यातील नरंगल येथील युवा शेतकरी प्रदीप मुपुंद पट्टेकर (30) हे सततची नापिकी व महागाईमुळे त्रस्त होते. प्रदीप यांनी काल शनिवारी रात्री गळफास घेऊन आपले जीवन संपविले.

नाहीतरजमीनपडीकगृहीतधरलीजाईल सरकारचा अजब फतवा
ऑनलाईन फॉर्म भरा, नाहीतर जमीन पडीक म्हणून गृहीत धरल जाईल असा अजब फतवा सरकारने काढला आहे. एकीकडे परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. रविवारीही बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर होता. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या, तर दुसरीकडे महसूल खात्याने जून-जुलैमध्ये पेरणी केलेल्या खरिप हंगामाचा पेरा एका अर्जावर ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे फर्मान काढले.

जर हा पिकपेरा फॉर्म भरून न दिल्यास ती शेती पडीक असल्याचे गृहीत धरले जाईल असे म्हटले गेले. एकीकडे सर्व्हर डाऊन आहे. पावसाच्या सरी कोसळत आहे. झालेल्या नुकसानीमध्ये शेतकरी चिंतेत आहेत. ही सगळी संकटे बाजुला असून शेतकऱयाला बांधावर जाऊन पीक पेऱयाचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावा लागत आहे.






