धक्कादायक, चुबळी फाट्याजवळ अढळला २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह
जामखेड प्रतिनिधी
जामखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर चुंबळी फाट्या जवळील एका हॉटेल मध्ये एका २४ वर्षीय तरुण विजय महादेव वाळुंजकर रा. जवळा याचा मृतदेह आढळून आला. सकाळी हॉटेल उघडले असता कर्मचाऱ्यांना ही घटना निदर्शनास आली.
याबाबत हकीगत अशी की, सोमवारी (दि. १२) साडेअकरा वाजता विजय महादेव वाळुंजकर हा आपले राहते घर जवळा येथून पुण्याला जाण्यासाठी निघाला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (दि.१३ ) सकाळी सहा वाजता त्याने आपल्या मित्राला फोन केला. माझ्या छातीत दुखत आहे. मला लवकर दवाखान्यात घेऊन जा .दरम्यान पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत यांनी तातडीने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे जाऊन त्यांना त्यांची रुग्णवाहीका घेऊन समक्ष घटनास्थळी दाखल झाले. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी विजय यास जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणून पोहोच केले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. सशांक वाघमारे यांनी विजय यास मृत घोषीत केले.
या घटनेची खबर अजित महादेव वाळुंजकर यांनी दिली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत हे तपास करत आहेत.
पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत यांनी सांगितले की सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मी फोन केला की लगेच येतात. १०८ ही गाडी घटनास्थळावर गेली होती. परंतु त्यांनी मृतदेह आणला नाही. तसेच बऱ्याच वेळा खाजगी गाडीवाले मृतदेह आणण्यास आडवा आडवी करतात परंतु सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे मी गेलो असता ताबडतोब गाडीत बसले आणि रुग्णवाहिका घेऊन जामखेड ग्रामीण रुग्णालयात मृतदेह दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here