जामखेड प्रतिनिधी (रोखठोक न्यूज)

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाज बांधवांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत मंजूर झालेल्या मदारी वसाहतीचे बांधकाम प्रत्यक्षपणे जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत जामखेड तालुक्यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खा. डॉ. सुजय विखे, आ. रोहित पवार, प्रा.राम शिंदे व इतर कुठल्याही मंत्र्याला फिरू देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे भटके-विमुक्तांचे राज्य समन्वयक ॲड.डॉ.अरुण जाधव यांनी दिला.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे गेल्या 200 वर्षापासून वास्तव्य असलेल्या मदारी समाज बांधवांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मदारी वसाहतीचे बांधकाम सुरू करावे या मागणीसाठी जामखेड शहरातील खर्डा चौकात वंचित बहुजन आघाडी व लोक अधिकार आंदोलनाच्या वतीने भटके मुक्त आघाडीचे राज्य समन्वयक ॲड.डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी भटके-मुक्त दिनानिमित्त अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ॲड.डॉ अरुण जाधव म्हणाले खर्डा येथील मदारी मेहतर समाजाचे वंशज गेल्या साठ वर्षापासून खर्डा बाजार तळातील ओट्यावर पाल टाकून राहतात. जामखेड तालुक्याला दोन आमदार एक खासदार असे तीन लोकप्रतिनिधी असून देखील मदारी वसाहतीचा प्रश्न पाच वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तो पर्यंत वंचित बहुजन आघाडी व लोक अधिकार आंदोलन आपले आंदोलन सुरूच ठेवणार आहे.

गुरुवार दिनांक 1 सप्टेंबर पासून पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात मदारी समाज बांधवासह लोक अधिकार आंदोलन व वंचित बहुजन आघाडीचे कार्येकर्ते धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या दरम्यान कुठल्याही कार्यकर्ता किंवा मदारी समाज बांधवांना काहीही झाले तरी तीनही लोकप्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

लोक अधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापु ओहोळ यांनी आंदोलना मागची सविस्तर माहिती यावेळी मांडली. खर्डा येथील मदारी समाजाचे प्रतिनिधी सलीम मदारी, मुस्तफा मदारी, कबीर मदारी, रवींद्र शिरसाट, फकीरा मदारी, सागर ससाने, हुसेन मदारी, रहीम मदारी, फकीर मदारी, मोहम्मद मदारी, असलम मदारी, सिकंदर मदारी, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष आतिश पारवे,लोक अधिकार आंदोलनाचे ता.अध्यक्ष विशाल पवार,म.जि. अध्यक्ष द्वारका पवार, शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे, वैजनाथ केसकर, संतोष चव्हाण,, तुकाराम पवार, आणि अरुण डोळस आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळी अकरा ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सुमारे दोन तास खर्डा चौकातील वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार व ग्रामसेवक सातपुते त्यांनी पंचायत समितीच्या वतीने आणलेले पत्र स्वीकारण्यास ॲड. डॉ अरुण जाधव यांनी स्पष्ट नकार दिला. प्रशासनाने प्रत्यक्ष काम सुरू न करता पत्राद्वारे केवळ आश्वासन देणे म्हणजेच आंदोलन कार्यकर्ते व मदारी समाज बांधवांना झुंलवत ठेवणे होय असे मत सलीम मदारी यांनी व्यक्त केले.

यावेळी मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, आम आदमी पार्टीचे संतोष नवलाखा, बजरंग सरडे, मुस्लिम पंच कमिटी सदस्य अजहर काजी, इस्माईल टेलर, ह.भ.प गाडे महाराज यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

या आंदोलना दरम्यान खर्डा चौकात प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अजहरभाई काजी, बजरंग सरडे, संतोष नवलाखा, प्रदीप टापरे, संतोष चव्हाण ,सलीम मदारी यांची भाषणे झाली. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, अरुण डोळस यांनी आभार मानले. या आंदोलनात भीमराव सुरवसे, लाला वाळके, सुग्रीव मोरे, अरुण चव्हाण, संतोष शेगर, मोहन शिंदे, आजिनाथ शिंदे, बारीकराव लोंढे, सोनू राखपसरे, अशोक वाल्हेकर, कबीर मदारी, रवींद्र सिरसाट आदी कार्येकर्ते सहभागी झालेहोते. या आंदोलनासाठी सचिन भिंगारदिवे, अतुल ढोणे, राजू शिंदे, संतोष चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here