जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथिल मार्केट यार्ड मधील बैल बाजारात एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. भरत गुणाजी मोरे, राहणार मिलिंदनगर, जामखेड असे सदर मयत व्यक्तीचे नाव आहे.
बीड रोडवरील मार्केट यार्ड मध्ये मंगळवार दि. १६ आॅगस्ट रोजी सकाळी मिलिंदनगर या भागात रहाणार्या भरत गुणाजी मोरे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर जामखेड येथिल सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना एक फोन आला की, जामखेड मार्केट यार्ड मधील बैल बाजारात एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटनेची माहिती समजतात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी स्वतःची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना फोन द्वारे कळवली असता त्यांनी ताबडतोब पोलीस कॉन्स्टेबल अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देवडे यांना पाठवले. त्यांनी पंचनामा करून सदर मृतदेह कोठारी यांच्या रूग्णवाहिकेत टाकला. व ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम साठी आणून पोहोच केला आहे. यावेळी नजीर शेख , राहुल अहिरे यांनी त्यांना मदत केली.
आत्महत्या केलेल्या भरत गुणाजी मोरे रा. मिलिंदनगर, जामखेड यांच्या बहीणीने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीबरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील बडे करत आहेत. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी केले.





