जामखेड प्रतिनिधी
खर्डा परीसरात झालेल्या जोरदार पावसामुळे काल येथिल कौतुका नदीला मोठा पुरू आला होता. यामुळे पुलावरील खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली होती.

जामखेड तालुक्यातील खर्डा या ठिकाणी काल दि. ७ आॅगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने खर्डा जामखेड रोडवर असलेल्या कौतुका नदिला मोठा पूर आला. तब्बल दोन ते अडीच तास झालेल्या पावसाने खर्डा शहर व परिसर जलमय झाला होता. या पावसामुळे कोतुका नदीला आलेल्या पावसामुळे खैरी तलावाच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र कौतुका नदीच्या पुलावर असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने वाहन धारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्डात पाणी साचून झालेल्या अपघातामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटून एखादे वहान नदीत जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यातरी होणारे अपघात सुरू आहेत. कौतुका नदीपुलावरी खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारक व खर्डा ग्रामस्थ करत आहेत.






