जामखेड प्रतिनिधी : १६ मे
जामखेड येथिल श्रीनागेश व कन्या विद्यालयाच्या १९९८ च्या बारावी बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न. तब्बल २५ वर्षांनंतर आपल्या वर्गातील सवंगडी व शिक्षकांना पाहून अनेकांना गहिवरून आले. जून्या आठवणींचा एक निखळ आनंद देणारा सोहळा खूप दिवसानी पाहता आल्याच्या भावना विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.
यावेळी भटके विमुक्तांचे नेते ॲड. डॉ.अरुण जाधव नागेश विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. के मडके, भोसले मॅडम, काकडे मॅडम, ककडे सर, मोहन डुचे सर,सदाफुले सर, माजी प्राचार्य आर. टी. साखरे, समींदर सर, हडूळे सर, पिंपळे सर, मडके सर, सोनवणे सर, वारे सर आणि उपस्थित शिक्षकवृंद आणि मान्यवर उपस्थित होते.
पूर्वनियोजनाप्रमाणे सकाळी शिक्षकांच्या समोर उभे राहून एकसुरात अभिवादन करून सर्वांनी शाळेतील वातावरण पुन्हा अनुभवले. त्यानंतर उपस्थित मान्यवर व शिक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सर्व उपस्थित शिक्षकांना कृतज्ञतापत्र व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. कृतज्ञतापत्राचे शब्दांकन दीपाली भिडे-गोखलेयांनी तर हस्तलेखन संतोष घोलप यांनी केले होते. या मेळाव्यात सर्व शिक्षक तसेच काही माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते करताना काही वेळा भावूक तर काही वेळा खेळीमेळीचा भाव निर्माण होत होते. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या निवारा बालगृहला धान्य शिधा देण्यात आला. तसेच शाळेच्या हॉलसाठी पंखे बसवून देण्यात आले.
सर्व तत्कालीन शिक्षक व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी कुटुंबियांसह स्नेहभोजन केले. त्यानंतर काकडे सर आणि मॅडम यांनी मुलाच्या गोटात बसून सर्वजण आज काय करतात याची माहिती घेतली. एवढा वेळ आजही या शिक्षकानी दिल्याचे हे वेगळे उदाहरण आहे. २५ वर्षांनंतर घडलेल्या या अभूतपूर्व भेटीने भरवून गेलेल्या सर्वांचे ताजेतवाने चेहरे बरच काही बोलून गेले.नुसत्या भेटी नाही तर सामाजिक कार्यात पुढाकार घेण्यासाठी घडलेला हा एक आगळा वेगळा सोहळा पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडला.
ADVERTISEMENT

कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन नगर सेवक मोहन पवार, उमेश माळवदकर, संतोष घोलप, गणेश शेंडकर, दीपाली भिडे-गोखले, शिल्पा साखरे-घोडेस्वार, शोभना सातव- फुले, अश्विनी जरे-सुपेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिल्पा साखरे-घोडेस्वार, अध्यक्षांची निवड सतीश सदाफुले यांनी, अनुमोदन उमेश माळवदकर, प्रास्ताविक दीपाली भिडे-गोखले तर आभार शोभना सातव -फुले यांनी मानले. दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली आणि शेवटी वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.





