जामखेड प्रतिनिधी 


शालेय उपक्रमातून संस्कार व मूल्यांची रुजवणूक होते,त्यामुळे शाळेत प्रत्येक उपक्रम राबविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.कैलास खैरे यांनी केले.

जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी या शाळेच्या सन 2021-22या शैक्षणिक वर्षातील वार्षिक तपासणी कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी खर्डा व तेलंगशी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.मुकुंदराज सातपुते ,तेलंगशी गावचे सरपंच श्री.कांतीलाल जाधव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत जायभाय,मुख्याध्यापक केशव गायकवाड,रुपेश वाणी,CRG सदस्य सचिन पवार,शिवाजी घोडके व भाऊसाहेब डिडूळ हे यावेळी उपस्थित होते.
जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी या शाळेतील शिक्षक उपक्रमशील आहेत.बालपणी घडविणारे शिक्षक आयुष्यभर लक्षात राहतात.विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्याचा प्रेरणादायी सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शालेय गुणवत्तेइतकेच संस्कार व मूल्यशिक्षणाला महत्व देणारे तेलंगशी शाळेतील शिक्षक असून शालेय गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचा अभिप्राय यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री.कैलास खैरे यांनी दिला.यावेळी केंद्रप्रमुख सातपुते व सर्व CRG सदस्य यांनी वर्ग तपासणी करुन शालेय गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत तेलंगशी शाळेच्या झांजपथकाच्या सादरीकरणाने श्री.आनंता गायकवाड यांनी केले.शालेय अभिलेखे, स्वच्छता, नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र,संगणक प्रयोगशाळा या सर्व बाबींची पाहणी केली. विद्यार्थ्यांचे विविध कलागुण पाहून उपस्थित मान्यवरांनी 2101 रु. रोख स्वरुपात देऊन विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले. प्रास्ताविक श्री.केशव गायकवाड यांनी केले. शाळेत राबवित असलेल्या सर्व उपक्रमाचे सादरीकरण श्री.सुशेन चेंटमपल्ले यांनी तर आभार श्री.विजयकुमार रेणुके यांनी मानले. संतोष गोरे व लक्ष्मी जायभाय यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here