कर्जत प्रतिनिधी

कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये  प्रभाग १४ मधील निवडणुकीकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
उमेदवार ताराबाई सुरेश कुलथे यांनी विजय मिळवला ,आणि  विजयाचा चौकार लगावला आहे . यापूर्वी त्यांनी सलग दोन वेळा विजय मिळवला होता, तर सोमनाथ कुलथे हे त्यांचे सुपुत्र मागील वेळी नगरसेवक म्हणून विजयी झाले होते ते उपनगराध्यक्ष होते. या प्रभागाची निवडणुक भाजपने मोठी प्रतिष्ठेची केली होती. तरीही सचिन कुलथे यांच्या सुयोग्य नियोजनामुळे ताराबाई कुलथे या मोठ्या फरकाने विजयी झाल्या. त्या एकमेव उमेदवार आहेत की कुलथे कुटुंबीयांनी सलग चौथ्यांदा या प्रभागा मधून विजय मिळवला आहे.

कर्जत नगरपंचायत ची निवडणूक यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर अढवली गेली. काही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुरस असल्याने तिथं काटे की टक्कर होती. यापैकी प्रभाग १४ हा देखील होता. या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ताराबाई सुरेश कुलथे यांचा पराभव करा असे भाजपच्या वतीने माजी मंत्री राम शिंदे व खासदार सुजय विखे पाटील यांनी जाहीर सभेमध्ये मतदारांना आवाहन केले होते. प्रचाराच्या काळामध्ये भाजपने या प्रभागातील निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती प्रभा कडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आमदार रोहित पवार यांनीदेखील या प्रभागा मधून ताराबाई कुलथे यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवला एवढेच नव्हे तर प्रभागातील प्रत्येक मतदारांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन श्रीमती कुलथे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते.

सचिन कुलथे यांनी या प्रभागांमध्ये त्यांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा निकालानंतर सिद्ध केले. गेल्या वीस वर्षांपासून या प्रभागांमध्ये सचिन कुल्फी हे सातत्याने विजय खेचून आणत आहेत ही परंपरा त्यांनी यावेळी देखील कायम राखली. यावेळी बोलताना सचिन कुलथे यांनी या विजयाचे श्रेय आमदार रोहित पवार यांना दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले की आमदार रोहित पवार यांनी आमच्यावर विश्वास व्यक्त केला आणि आम्ही तो सार्थ ठरवताना या प्रभागा मधून मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. या विजयाचे सर्व श्रेय आमदार रोहित पवार त्याचप्रमाणे प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनी व सर्व युवक मित्रांना आहे असे सचिन कुलथे म्हणाले. विजया नंतर ताराबाई सुरेश कुलथे यांची प्रभागांमधून समर्थकांनी प्रचंड जल्लोष करत मिरवणूक काढली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here