जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील आपटी, पिंपळगाव आवळा व वाघा परीसरात भरदिवसा घरफोड्या करुन तीन चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचांदीचा पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला होता. मात्र वाघा येथील ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगत याबाबत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून कॉल करुन ग्रामस्थांना सावध करत अखेर मोटारसायकल वरील तीन आरोपींना पकडुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या मुळे वाघा ग्रामस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या चोरी प्रकरणी आदित्य उर्फ सोंड्या गणेश पिंपळे. वय वर्ष २० राहणार, अशोक नगर ,श्रीरामपूर ,जिल्हा अहमदनगर, प्रदीप उर्फ चक्क्या चंद्रकांत काळे वय २१ वर्ष, व बाबू फुलचंद काळे. वय २४ वर्ष ,दोघेही रा, सदाफुले वस्ती, तालुका. जामखेड अशा तीन आरोपींना पकडण्यात आले आहे.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की दि १५ रोजी सकाळी फीर्यादी गणेश मधुकर ढगे रा. पिंपळगाव आवळा हे आपल्या घरातील सर्वजण सकाळी दहा वाजता घराला कुलूप लावून शेतात गेले होते. या नंतर त्यांचे वडील दुपारी पावनेदोन वाजता घरी आले आसता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. तसेच घरातील रोख रक्कम २५ हजार रुपये व ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आसल्याचे फीर्यादी गणेश ढगे यांच्या लक्षात आले. फीर्यादी यांनी गावात आनखी माहिती घेतली असता गावातील हबीब बाबुलाल शेख, सय्यद नबीलाला शेख, सलिम नबीलाला शेख व आपटी येथील सावकार साहेबराव जगदाळे, मिलिंद सावकार जगदाळे, कीरण अजिनाथ खुपसे, यांच्या घरी देखील चोरी झाली असुन त्यांचा देखील सोन्या चांदीचा एवज चोरटय़ांनी चोरुन नेला आसल्याचे लक्षात आले.

या नंतर चोरटय़ांनी आपला मोर्चा त्याच दिवशी सव्वातीन वाजता आपला मोर्चा वाघा गावाकडे वळवला व या तीन चोरट्यांनी दुसरे फीर्यादी सुमंत मारुती जगदाळे, रा. वाघा यांच्या घराकडे वळवळा फीर्यादी देखील घराला कुलूप लावून शेतात गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून २२ हजार रु रोख व ४२ हजार रुपयांचा सोन्या चांदीचा एवज असा एकूण ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

ही घटना वाघा येथील उपसरपंच शिवाजी बारस्कर यांना आपल्या गावात चोरी झाल्याची घटना समजली त्यांनी तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या कॉल वर कॉल करुन गावातील लोकांना जागृत केले. या नंतर गावात लोक एकत्र जमा होऊन या चोरट्यांचा शोध घेत आसताना वरील तीन चोरटे मोटारसायकल सह गावात चोरी करताना अढळुन आले. या नंतर ही घटना उपसरपंच शिवाजी बारस्कर यांनी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना सांगितली. त्यांनी तातडीने त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, पो. कॉ अविनाश ढेरे, संजय लोखंडे, विजय कोळी, संदीप राऊत संग्राम जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तीनही चोरट्यांना ग्रामस्थांन कडुन ताब्यात घेतले व अटक केली. या तीनही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात व पो. हे. कॉ. संजय लोखंडे हे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here