

भक्तिमय वातावरणात श्री नागेश्वर पालखी सोहळा जामखेडला उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी
भक्तिमय वातावरणात वारकरी परंपरेनुसार टाळ-मृदुंगाच्या जयघोषात जामखेड येथे सोमवारी श्री नागेश्वर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी पालखी सोहळ्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. शुद्ध वारकरी परंपरेने हा पालखी सोहळा संपन्न झाला.
जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वराची नागपंचमीच्या निमित्ताने यात्रा भरते. गेल्या २३ वर्षांपासून यानिमित्ताने श्री नागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. सोमवारी सकाळपासूनच शहरात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण होते. सकाळी शिवलीलामृत पारायण झाले.
प्रातःकाळी यजमान जामखेडच्या नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई अमित चिंतामणी व अमितशेठ चिंतामणी तसेच श्री. गोवर्धन जोरे व सौ. मंगलाताई जोरे यांच्या हस्ते भगवान श्री नागेश्वराची विधिवत पूजा करण्यात आली.

दरम्यान, पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळांनी मंदिरासमोर भजन सुरू केले. विठोबा-रखुमाई भजन झाल्यानंतर यजमानांच्या हस्ते पालखीमध्ये मुखवटा स्थापन करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांनी एकच जयजयकार केला. पालखी रथामध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर ‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’, ‘ॐ नमः शिवाय नागेश्वराय, शिव नागेश्वराय’ तसेच ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषात आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली.

श्री नागेश्वर मंदिरापासून पालखी मिरवणूक सुरू झाली. श्री नागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, लक्ष्मी चौक, संविधान चौक, श्री विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, जुने कोर्ट, महादेव गल्लीमार्गे वैतरणा नदी तीरातून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालखी मार्गावरून हा सोहळा पुन्हा श्री नागेश्वर मंदिर येथे पोहोचला.
कीर्तन मंडपात दिंडी पोहोचल्यानंतर ‘संत भार पंढरीत’ हा अभंग घेण्यात आला व आरती करण्यात आली.
या पालखी सोहळ्यात विठ्ठल भजनी मंडळ, श्री नागेश्वर भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था, जगदाळे वस्ती भजनी मंडळ, बोराटे वस्ती भजनी मंडळ, बटेवाडी भजनी मंडळ तसेच पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळे सहभागी झाली होती. दिंडी मार्गावर महिलांनी सडा-रांगोळी काढली होती. शहरात ठिकठिकाणी पालखी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. एकूणच संपूर्ण जामखेड शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते.

यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, मनसे नेते प्रदीप टाफरे, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, शिवसेना युवा नेते आकाश बाफना, बांधकाम समितीचे सभापती तथा नगरसेवक मोहन पवार, नगरसेवक संजय काशिद, नगरसेवक राजेंद्र गोरे, प्रशांत राळेभात, पवन राळेभात, अमित चिंतामणी, दिगंबर चव्हाण, मनोज कुलकर्णी, प्रविण चोरडिया, बजरंग डूचे, सचिन शिंदे, अमोल लोहकरे, शिवकुमार डोंगरे, ॲड. महारूद्र नागरगोजे, राजेंद्र जाधव, प्रा. ज्ञानदेव कुंभार, गणेश डोंगरे, संजीवन मेंढकर आदी उपस्थित होते. भजनी मंडळाचे पंढरीनाथ महाराज राजगुरू, हरिदास गुंड, जगन्नाथ धर्माधिकारी, संतोष पाटील आदींचीही उपस्थिती होती.

या संपूर्ण उत्सवासाठी श्री नागेश्वर सेवा मंडळाचे बाबासाहेब खराडे, बबलू देशमुख, मिलिंद ब्रम्हे, संतोष बारगजे, विनायक राऊत, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, दिलीप कुमार राजगुरू, नागेश पानसाडे, सिताराम राळेभात, उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, दत्तात्रय काळे, सत्येंद्र पाटील, शाम क्षिरसागर, किरण सोनवणे, नंदू शिंदे, दर्शन भोसले, आदित्य पोकळे, ओम भोसले, कृष्णा मिसाळ, रोहित खवळे, रोहन बांदल, सुमित बकरे, आर्यन धनवडे, ओम काकडे, अक्षय राळेभात, रोहित शिंदे, रोहित कोल्हे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, श्री विजय राजकर, श्री सचिन अटकरे, सुयश हजारे, ओम घुले, बंडू मेहत्रे, मारुती झगडे, भागवत गवळी, नागेश पानसाडे आदी अहोरात्र अथक परिश्रम घेत आहेत.

चौकट
मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने श्री नागेश्वर पालखीचे स्वागत
मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने श्री नागेश्वर पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याचे विणेकरी ह.भ.प. संतोष महाराज बारगजे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अझहरभाई काझी, उपाध्यक्ष हाजी मंजुरअली सय्यद, सचिव आबेद खान, सहसचिव इस्माईल सय्यद, खजिनदार हाजी मुख्तार सय्यद, सल्लागार नाझीम काझी, हाजी जावेद बागवान, इस्माईल टेलर, इम्रान कुरेशी तसेच मुस्लिम पंच कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.







