जामखेडमध्ये मान्सून पुर्व तयारी आढावा बैठक संपन्न

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथे आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभाग प्रमुखांची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत संभाव्य पूर परिस्थिती, आपत्ती व्यवस्थापन, नालेसफाई, धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, आणि साथीच्या आजारांच्या नियंत्रणाबाबत सविस्तर चर्चा करून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती तहसीलदार धनंजय बांगर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

तहसीलदार धनंजय बांगर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी गटविकास अधिकारी शुभम जाधव, मुख्याधिकारी अजय साळवे, आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, सहायक निबंधक, पोलीस निरीक्षक, बांधकाम अभायंंता, महावितरण अभियंता, यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी तहसीलदार धनंजय बांगर यांनी सांगितले की, पूर किंवा अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी नियंत्रण कक्ष (Control Room) २४ तास सुरू ठेवणे.पाणंद रस्ते व नालेसफाई: पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून शहरातील गटारे व नाले यांची वेळेत स्वच्छता करणे.

आरोग्य यंत्रणा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी औषध साठा आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवणे.वीज आणि रस्ते सुरळीत वीज पुरवठ्यासाठी वीज वितरण कंपनीला आणि रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तत्काळ कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच पावसाळ्यात जे पुल पाण्याखाली जातात तेथे पर्यायी व्यवस्था निर्माण करणे रोगराई रोखण्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे, धोकादायक इमारती, धोकादायक लाईट पोल याबाबत संबधित विभागास योग्य त्या सूचना देण्यात आल्या जेणे करून नागरिकांना त्रास होणार नाही.

तसेच सध्या टंचाई परिस्थिती आहे त्यामुळे बोअर व विहिर अधिग्रहण करणे सध्या दिघोळ, मोहा, सावरगाव येथे काही विहिरी व बोअर अधिग्रहण केले आहेत. तसेच कालच नान्नज या ग्रामपंचायत चा टॅंकर चा प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव वरती मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. अशा प्रकारे सर्वच विभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here