Home ताज्या बातम्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून युवकाला आरोग्य उपचारासाठी दोन लाखांची मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून युवकाला आरोग्य उपचारासाठी दोन लाखांची मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून युवकाला आरोग्य उपचारासाठी दोन लाखांची मदत

मुस्लिम बांधव व शामीरभाई सय्यद मित्र परिवाराच्या वतीने शिवसेना युवानेते आकाश बाफना यांचा सत्कार

जामखेड प्रतिनिधी

शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना यांनी शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जामखेड येथील मुस्लिम समाजातील एका गरजू युवकाला आरोग्य उपचारासाठी दोन लाख रुपयांची मदत मिळवून दिली. या मदतीबद्दल मुस्लिम बांधवांनी आकाश बाफना यांचे आभार मानले.

मुस्लिम युवकाला आरोग्य उपचारासाठी दोन लाख रुपयांची मदत मिळवून दिल्याबद्दल शुक्रवार दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांचा मुस्लिम समाज व शामीरभाई सय्यद मित्र परिवाराच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना बोलताना सांगितले की शिवसेना पक्ष कधी जात पात पहात नाही. सामान्य माणसाच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कधीही कमी पडत नाही. कारण शिवसेनेचा मूलमंत्रच आहे की ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कार्यकर्त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून एकही सेकंदाचा विचार न करता तात्काळ जामखेडच्या युवकाला आरोग्य उपचारासाठी दोन लाखांची मदत दिली, हीच शिवसेनेची कार्यपद्धती आणि संवेदनशीलता दर्शवते.

यावेळी माजी नगरसेवक शामीर सय्यद यांनी सांगितले की अनेक लोकप्रतिनिधी स्वतः निर्णय घेण्याऐवजी फक्त फोन करून योजनेत बसवा असे सांगतात. प्रत्यक्षात शासनाच्या योजना सर्वांसाठी आहेत, त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वारंवार चकरा मारायला लावणे चुकीचे आहे. आकाश बाफना यांनी तात्काळ आरोग्य उपचारासाठी मदत मिळावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे मदत आरोग्य मदत मिळाली.असे गौरवोद्गार सय्यद यांनी काढले.

यावेळी जामखेडचे ज्येष्ठ समाजसेवक हाजी डॉ. फारूक शेख, माजी नगरसेवक शामीर भाई सय्यद, रौफ सय्यद, दत्तात्रेय चऱ्हाटे, जावेद फिटर, अली भाई तांबोळी, शौकत भाई सय्यद, करीम भाई सय्यद, अजित बागवान, राजू सय्यद, अजहर शेख, आदिल सय्यद, अरिफ सय्यद, शहबाज सय्यद, इराणी इंतकाब, पप्पू शेख, मोसिन पठाण, हरून सय्यद, आय्यास खान, इरफान पठाण, यासीर सय्यद, अरबाज शेख, आफताब मुन्ना सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट

शिवसेना पक्ष हा जात, धर्म, पंथ या सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन काम करणारा पक्ष आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत पोहोचवणे, गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आणि माणुसकी जपणे हीच आमची खरी भूमिका आहे. कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वसामान्य जनतेची सेवा करणे, हेच आमचे ध्येय आहे.

(आकाश बाफना, शिवसेना युवानेते)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here