


जामखेडमध्ये ‘व्हिजन प्लस आय क्लिनिक’चा उद्घाटन सोहळा संपन्न
डॉ. मिसबा फारुख शेख या जिल्ह्यातील पहील्या ग्लॉकोमा (काचबिंदु) सर्जन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील नागरिकांसाठी आधुनिक नेत्रतपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘व्हिजन प्लस आय क्लिनिक’चे उद्घाटन शनिवार, दि. १८ जुलै २०२५ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. विशेष म्हणजे आता जामखेडच्या रुग्णांना नगर किंवा पुणे येथे जाण्याची आवश्यकता नाही. सर्व प्रकारच्या नेत्ररोगांचे निदान व उपचार एकाच छताखाली होणार आहेत.

अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेल्या या क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या नेत्ररोगांचे निदान व उपचार एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या क्लिनिकमध्ये डॉ. मिसबाह फारूक शेख (एमबीबीएस, एमएस ऑप्थाल्मोलॉजी, FAEH – Glaucoma) हे सेवा देणार असून, त्यांनी कोयंबतूर येथील अरविंद आय हॉस्पिटलमध्ये ग्लॉकोमा विषयातील विशेष प्रशिक्षण घेतले आहे. तसेच मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रियेचा त्यांना अनुभव आहे.

क्लिनिकमध्ये संपूर्ण नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ग्लॉकोमा निदान व व्यवस्थापन, मधुमेहजन्य रेटिनोपॅथी निदान, रेटिना तपासणी, लेझर उपचार तसेच चष्म्याचा नंबर तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध असणार आहेत. आठवड्याच्या शनिवार व रविवार सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ओपीडी सुरू राहणार आहे. अपॉइंटमेंटसाठी ९४२३४६१०४६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘व्हिजन प्लस आय क्लिनिक’ हे डॉ. फरूक आझम, अलहरम हॉस्पिटल, सदाफुले वस्ती, जामखेड येथे सुरू होत असून, शहर व परिसरातील नागरिकांनी या आधुनिक नेत्रसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल चे संचालक डॉ. फरूक आझम यांनी केले आहे.

उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत होशिंग सर होते तर उद्घाटक बाळासाहेब पारखे, जानमोहम्मद पठाण, मुमताज पठाण व नरेंद्र ढवळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रमेश गुगळे, मुस्लिम पंच कमिटीचे अझहर काझी, नगरसेवक ॲड. अरुण जाधव होते. यावेळी नगरसेवक वसीम सय्यद, माजी नगरसेवक शामीर सय्यद, मुक्तार टेलर, हाजी जावेद बारूद, राजू खान, हाजी नादीरभाई, आयुब पठाण, युसुफ शेख, ॲड. अल्ताफ शेख, इंजि. उमर शेख, स्वीय सचिव डॉ. अल्ताफ शेख, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. संजय राऊत, डॉ. चंद्रकांत मोरे, डॉ. काकडे, डॉ. प्रदीप कुडके, डॉ. पांडुरंग सानप, डॉ. सरफराज खान, डॉ. भरत देवकर, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.









