

येणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यावर भगवा फडकु – राम रेपाळे
जामखेड येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न
जामखेड प्रतिनिधी
इतिहास घडवायचा असेल तर
शिवसेनेत वेड्या सारखे काम करा, एकनाथ शिंदे यांनी टीकेने नाही तर कामाने विरोधकांना उत्तर दिले आहे.
येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीवर निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यावर भगवा फडकवु असे मत
शिवसेनेचे सचिव व अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख राम रेपाळे यांनी मेळाव्या दरम्यान व्यक्त केले.

जामखेड शहरात गुरवार दि ९ एप्रिल रोजी शिवसेना विभागीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी रेपाळे बोलत होते. पुढे बोलताना रेपाळे म्हणाले की महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी सर्वात जास्त जनकल्याण योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री असताना महीलांसाठी लाडकी बहीण योजना बरोबरच महिलांच्या हितासाठी आनेक योजना आनल्या. शिवसेनेत काम करित असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करा. तळागाळातील लोकांपर्यंत काम करणारे मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदे होते. कर्जत जामखेड वर भगवा फडकवल्या शिवाय रहाणार नाही. सर्व सामन्य कार्यकर्त्यांना राजकारणात पुढे घेऊन जाण्याचे काम फक्त शिवसेनाच करते. कर्जत जामखेड मध्ये पंचायत समितीचा सभापती हा शिवसेनेचा असला पाहिजे, शिवसेनेत गटबाजी चालत नाहीत, जनतेसाठी काम करणारा शिवसैनिक पाहीजे, गाव तीथे शिवसेनेची शाखा उभारा, कार्यकर्त्यांनो काम करा आपली सत्ता आहे. चांगले काम केले तर पुन्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्या शिवाय रहाणार नाहीत. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात या पुढचे खासदार व आमदार शिवसेनेचे निवडुन अणायचे आहेत.

शिवसेना नेते आकाश बाफना म्हणाले की आम्ही नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यान दोन्ही आमदारान विरोधात बंड पुकारले व शिवसेनेचा पॅनल उभा केला होता. राजकारणाची परीस्थिती बदलत चालली आहे. निवडणुकीच्या दरम्यान पैशांचा वापर केला जातो हे दुर्दैव आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकात शिवसेनेचा भगवा फडकवणार आहोत. एकजुटीने काम करुन सर्व सामान्य जनतेच्या आडचणी सोडवु, येणारा कर्जत जामखेडचा आमदार शिवसेनेचा असेल.

शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, महीला अघाडीच्या डॉ. शबनम इनामदार, शिवसेना नेते प्रविण घुले, जेष्ठ नेते कैलास जाधव, उपजिल्हा प्रमुख संतोष वाळुंजकर व ता. उपप्रमुख नितीन कोल्हे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्याचे आयोजन शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांनी केले होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, शिवसेना युवा नेते आकाश बाफना, तसेच महीला अघाडी च्या जिल्हा प्रमुख डॉ. शबनम इनामदार, नगरसेविका वर्षा कैलास माने, शिवसेना नेते प्रविण घुले, बापुसाहेब नेटके, दिपक जंजीरे पाटील, प्रविण बोलभट, नितीन तोडमल, सोमनाथ शिंदे, शामिरभाई सय्यद, जेष्ठ नेते कैलास जाधव, उपजिल्हा प्रमुख संतोष वाळुंजकर व ता. उपप्रमुख नितीन कोल्हे, किरण मराळ, मोहन देवकाते, नवनाथ पाचरणे, व कुलदीप पवार सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट
यावेळी रविंद्र भानुदास बांगर यांची जामखेड तालुका युवासेना उपप्रमुखपदी, राजेंद्र रमेश तनपुरे यांची युवासेना शिऊर पं. स. गण प्रमुखपदी व आदित्य सुदाम वाळुंजकर यांची युवासेना खर्डा पं. स. गण प्रमुखपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र त्यांना शिवसेना पक्षाचे सचिव तथा अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख रामजी रेपाळे यांच्या हस्ते देण्यात आले.




