Home क्राईम न्यूज झिक्रि जवळ झालेल्या अपघातात स्विप्ट वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वराचा मृत्यू

झिक्रि जवळ झालेल्या अपघातात स्विप्ट वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वराचा मृत्यू

झिक्रि जवळ झालेल्या अपघातात स्विप्ट वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वराचा मृत्यू

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील झिक्री या ठिकाणी स्विप्ट कार व दुचाकीचा आपघात होऊन दुचाकी स्वराचा जाग्यावरच मृत्यू झाला. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवार दि ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी तीन वाजता दुचाकीस्वार हा जामखेड कडुन नान्नज या ठीकाणी चालला असता त्याची दुचाकी झीक्री येथील मंगल कार्यालया समोर आली याच दरम्यान स्विप्ट कार व दुचाकी वाहनाचा अपघात झाला. या आपघातात रामा बाबुजी भिसे, वय ३९ रा. टाकळसिंग, ता. आष्टी जि.बीड याचा जाग्यावरच मृत्यू झाला. आपघात झाल्या नंतर स्विप्टचा कार चालक हा घटस्थळाहुन फरार झाला.

सदरची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना पत्रकार लियाकस शेख यांनी दिली असता ताबडतोब संजय कोठारी यांनी ॲम्बुलन्स घेऊन आपले मित्र दीपक मोरे, ऋषिकेश शेळके यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली सदरी व्यक्तीचा मृतदेह जामखेड येथील सरकारी दवाखान्यात आणून दाखल केला. जामखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुंडलिक अवसरे यांनी मृत घोषित केले सदरील माहिती जामखेड येथील पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना माहिती दिली आहे पुढील तपास चालू आहे यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना अमोल कारले, योगेश मुळे, विशाल कोरडे यांनी मदत केली. मयत भिसे हा नान्नज येथील एका हॉटेल मध्ये वेटरचे काम करित होता. सध्या या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!