

जामखेड शहरात आरंभ फाउंडेशनच्या वतीने शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
जामखेड प्रतिनिधी
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्यात त्यांनी दीनदुबळ्यांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय दिला. महाराजांनी केव्हाही जातीयवाद केला नाही.जेव्हा महाराजांचे नाव येते तेव्हा त्यांच्या मनात महिलांबद्दल असणारा आदर या बाबत नेहमी ऐकायला मिळते.त्यांनी महिलांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांची शिवरायांनी कधीच गय केली नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील व शत्रूच्या स्त्रियांदेखील नेहमीच मानाने वागविले महिलांनाही जगण्याचा, सुरक्षित राहण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार दिला छत्रपतींचे कार्य, कर्तृत्व समजून घेण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे,’ असे मत जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांनी आरंभ फाउंडेशनच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उत्सव सोहळ्यात व्यक्त केले.

शहरातील आरंभ फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने कोर्ट रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगव्या ध्वजांच्या डौलात आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, गटविकास अधिकारी शुभम जाधव, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी नगरसेवक संजय काशीद, प्रा विकी घायतडक संतोष गव्हाळे अमित चिंतामणी, नगरसेविका सिमाताई कुलकर्णी, नंदाताई होळकर, वैशाली म्हेत्रे, शिवसेनेचे नेते आकाश बाफना राष्ट्रावादीचे शहाजी राळेभात, मंगेश आजबे, माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण, बापूसाहेब कार्ले, पांडुरंग माने, शिवकुमार डोंगरे, विशाल लोळगे, रवी बोधले वकील संघाचे अध्यक्ष ऍड प्रमोद राऊत,ऍड नितीन राजपुरे,पांडुरंग भोसले, लक्ष्मण भोरे आदींसह सर्व नगरसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते,यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, गटविकास अधिकारी शुभम जाधव, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी मनोगत व्यक्त करून आरंभ फाउंडेशनच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवभक्तांना थंड मठ्ठा वाटप करण्यात आले यावेळी आरंभ फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्ययांनी विशेष मेहनत घेतली सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजयकुमार जाधवसर यानी केले तर आभार उद्धव हुलगुंडे यानी मानले.तर पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव,योगेश दळवी,सचिन चव्हाण यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.









