

श्री क्षेत्र चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घराण्याची कन्या इक्षु शिंदेचा अमिरिकेत सन्मान
ग्लोबल फ्युचर स्कॉलर अँड डिप्लोमॅट म्हणून निवड
जामखेड प्रतिनिधी
धिरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बारावी शिक्षण घेत असलेल्या इक्षु शिंदे यांनी अमेरिकेत मोठा मान मिळवला आहे. ‘दि गॅरिबे इन्स्टिट्यूट फॉर सॉफ्ट पॉवर अँड पब्लिक डिप्लोमसी’ या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या संस्थेकडून त्यांची ‘ग्लोबल फ्युचर स्कॉलर अँड डिप्लोमॅट’ म्हणून निवड करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक भान आणि नेतृत्वगुण या तिन्ही घटकांवर आधारीत त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना मिळाला.

इक्षु यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांदरम्यान मतदार जनजागृतीसाठी कार्यशाळा व रॅलींचे आयोजन केले होते. या उपक्रमांद्वारे त्यांनी जवळपास ८ हजार मतदारांपर्यंत पोहोच साधली होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या सामाजिक उपक्रमांमुळेही त्यांचे कौतुक झाले. या सर्व योगदानामुळेच त्या जागतिक स्तरावरील या सन्मानासाठी पात्र ठरल्या, असे संस्थेने सांगितले.
फक्त शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातच नव्हे; तर इक्षु या भारतीय व पाश्चिमात्य शास्त्रीय नृत्यातही तितक्याच प्रवीण आहेत. त्या गुरू आदिती भागवत यांच्याकडे कथक शिकतात, तर नृत्यदिग्दर्शक अशली लोबो यांच्याकडून बॅले, जैज आणि हिप हॉपचे प्रशिक्षण घेतात. त्या सि.आय.डी.युनेस्को च्या सदस्य असून विविध कार्यक्रमात नृत्यप्रदर्शन करतात.
इक्षू शिंदे ही चोंडीचे सुपुत्र डॉ सुधाकर शिंदे (आयकर आयुक्त) यांची कन्या व युवा उद्योजक सौरभ उर्फ विशाल शिंदे यांची पुतणी आहे. असून भविष्यातही सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय योगदान देण्याची त्यांची भूमिका आहे.








