जामखेड प्रतिनिधी

वाढत्या रुग्ण संख्येमुळे जामखेड शहरात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लागु करण्यात आला होता. याची मुदत नुकतीच संपत आसल्याने उद्या दि २१ रोजी पासुन प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. या मध्ये पुर्वी प्रमाणे सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत किराणा दुकान, भाजीपाला, दुध, अंडी, मांस विक्री, व कृषी सेवा केंद्र ही सुरु रहाणार आहेत.

दिवसेंदिवस दिवस जामखेड तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली होती याच पार्श्वभूमिवर प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यानसमवेत पार पडलेल्या बैठकीत जामखेड शहरात १० ते २० मे पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू सर्वांच्या संमतीने जाहीर करण्यात आला होता. या दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आली होती. याची मुदत दि २० मे रोजी संपत आसल्याने व जामखेड शहरातील दि २१ मे पासून प्रशासना कडुन नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवार दि २१ तारखेपासून ते ३१ मे पर्यंत किराणा दुकान, दूध डेअरी, भाजीविक्री, अंडी, मटन विक्री व कृषी सेवा केंद्र ही सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली आहे. सकाळी सात ते अकरा नंतर अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणांशिवाय कोणासही घराबाहेर पडायचे नाही अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल अशी देखील माहिती प्रशासनाकडु देण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here