Home क्राईम न्यूज जामखेड शहरातील अवैद्य दारु विक्री करणाऱ्या दोन हॉटेलवर कारवाई, सव्वा लाख रुपयांचा...

जामखेड शहरातील अवैद्य दारु विक्री करणाऱ्या दोन हॉटेलवर कारवाई, सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त, तीन आरोपींना अटक

जामखेड शहरातील अवैद्य दारु विक्री करणाऱ्या दोन हॉटेलवर कारवाई, सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त, तीन आरोपींना अटक

जामखेड परिसरातील देशी- विदेशी अवैध दारू बाळगणाऱ्या हाॅटेलवर अहिल्यानगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने छापा टाकत 1 लाख 20 हजार 465 रूपयांच्या अवैध दारू वर कारवाई करत तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. यामुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीसांचे विशेष पथक तयार करून सदर पथकास जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने बुधवार दि. १८ रोजी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार जामखेड येथील नगर रोडवरील हाॅटेल पाटील वाडा, खर्डा रोडवरील हाॅटेल साई लाँजिंग येथे हाॅटेल मालक हे अवैध रित्या विनापरवाना देशी- विदेशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून केली आहे अशी खात्री लायक माहिती मिळाली.

यानुसार सदरचे पथक हाॅटेल पाटील वाडा येथे छापा टाकत 26910 रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा यात बिअर, व्हिस्की, रम असा माल व 15270 रूपये रोख रक्कम असा एकुण 42 हजार 180 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन हाॅटेल मालक आरोपी किसन सुरेश जरे यास ताब्यात घेतले.

यानंतर याच पथकाने जामखेड येथील खर्डा रोडवरील हाॅटेल साई लाँजिंग येथे छापा टाकत येथे विविध प्रकारच्या देशी विदेशी बिअर, व्हिस्की, रम असा एकुण 78 हजार 285 रूपयांचा अवैध माल ताब्यात घेऊन जप्त केला. पोलिसांनी आरोपी हाॅटेल मालक सचिन विक्रम तनपुरे व सतिश नवनाथ पवार दोन्ही रा. शिऊर व जामखेड याना ताब्यात घेतले आहे.

अशा प्रकारे दोन हाॅटेल वर कारवाई करत लाख 20 हजार 465 रूपयांच्या अवैध दारू वर कारवाई करत तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. यामुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. परिविक्षाधिन पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांच्या या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. स्थानिक पोलीसांचे लागेबांधे आहेत का ? आतापर्यंत स्थानिक पोलीसांनी का कारवाई केली नाही. अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी नेमलेल्या आहिल्यानगरच्या विशेष पथकातील परिवीक्षाधिन पोलीस उप अधिक्षक संतोष खाडे, अहिल्यानगर शहर विभाग प्रमुख पोसई राजेंद्र वाघ, शंकर चौधरी, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनील पवार, अजय साठे, अमोल कांबळे, अक्षय भोसले, सुनील दिघे, व पो काॅल भिंगारदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

चौकट

गुटखा व नियमबाह्य कलाकेंद्रावर कारवाई होणार का ?

जामखेड परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे. तसेच कलाकेंद्रात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असताना नियमांचे पालन केले जात नाही. यावर कारवाई होणार का? असा प्रश्न जामखेड करांना पडला आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!