

शहरातील अतिक्रमण काढून रखडलेला रस्ता तातडीने पुर्ण करा युवक झाले आक्रमक, दिला आंदोलनाचा इशारा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. अनेक वेळा फक्त अश्वासने देण्यात येतात मात्र काम पुर्ण झाले नाही. त्यामुळे तातडीने या राष्ट्रीय महामार्ग लगतची असलेली सर्व अतिक्रमणे काढून तातडीने या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा येत्या आठ दिवसात सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर जामखेड शहरातील व कुसडगाव येथील युवकांनी तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार व नगरपरिषद यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. विशेष म्हणजे याचा फटका जामखेड शहरातील नागरिकांना जास्त बसला आहे. या रस्त्याच्या संबंधित अनेक वेळा अनेक संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता तसेच निवेदनही देण्यात आली आहेत. मात्र रस्त्याचा व अतिक्रमणांचा प्रश्न सुटला नाही. शहरातील रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे आधी काढण्यात यावीत व मगच रस्ता करण्यात यावा अशी मागणी सध्या होत आहे. मात्र अतिक्रमण काढण्याबाबत प्रत्येक वेळी नुसते आश्वासन देण्यात येते मात्र फक्त गोरगरिबांचे हातगाडे व टपऱ्या या ठिकाणाहून हटविण्यात आल्या आहेत. तसेच मोठ्या व्यापारी वर्गांची अतिक्रमणे तशीच राहिली आहेत. याला कारण संबंधित अधिकारी वर्ग जबाबदार आहे. शहरातील अतिक्रमण निघण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून या अधिकाऱ्यांमुळे संरक्षण मिळत आहे. जामखेड मधील सर्व नागरिकांना वाहतुकीमध्ये यामुळे अडथळा निर्माण होत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाळ्यात देखील याठिकाणी नागरिकांना व वाहन चालकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

जामखेड शहरातील या राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून अतिक्रमणांमुळे व काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे वारंवार अपघात होऊन गेल्या काही महिन्यात आनेक लोकांचे बळी देखील गेले आहेत तर काही अपघातात लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेला आहे. वारंवार याबाबत अर्ज व निवेदन देऊन सुद्धा संबंधित ठेकेदार व अतिक्रमणा बाबत कसलीही कारवाई होत नाही. त्यामुळे तातडीने जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे लगत असलेल्या अतिक्रमण काढून लवकरात लवकर रस्ता मोकळा करून हा रस्ता पूर्ण करण्यात यावा अन्यथा येत्या आठ दिवसात त्रिव स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा जामखेड शहरातील युवक व कुसडगाव येथील युवकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जामखेड नगर परिषद व जामखेड तहसील कार्यालय यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर वैभव कार्ले, प्रशांत कात्रजकर, दत्तात्रय सरनोबत, गणेश गायकवाड, योगेश कात्रजकर, गणेश कार्ले, सुरज राऊत, गणेश खेत्रे, मनोज अब्दुले, चंद्रकांत कार्ले, विजय मोरे, सोपान जरांडे, रोहित चव्हाण, स्वप्निल शेळके, पवन आजबे, बाळु नेटके, राम जगदाळे, सागर डिसले, शुभम आजबे, राहुल आजबे, अशोक राळेभात, आप्पासाहेब आजबे, छगन आजबे, बाळासाहेब आजबे आदी युवकांच्या सह्या आहेत.






