महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जामखेड तालुका उपाध्यक्ष पदी राज बहीर यांची निवड
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जामखेड तालुका उपाध्यक्ष पदी राज बहीर यांची निवड करण्यात आली. नुकतेच आहील्यानगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अहिल्यादेवीनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी निवड कार्यक्रम घेण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जामखेड तालुका उपाध्यक्ष पदी राज बहीर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी बद्दल जामखेड तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी बोलताना राज बहिर यांनी सांगितले की मी आपल्या पदाचा उपयोग नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करणार आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे सांगितले
यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, जामखेड तालुक्यातील मनसे नेते गणेश खेत्रे, भैय्या जाधव (मंगेश construction) वैभव दादा बोरुडे ( मनसे शाखा सरचिटणीस, पारनेर ) रणजीत बहिर (ग्रा.प.सदस्य नाहुली ) अण्णा बहिर, नवनाथ बहिर, आकाश बहिर, धनंजय बहिर, आदित्य गर्जे सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अमितसाहेब ठाकरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून नवीन जबाबदारी दिली त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.