Home ताज्या बातम्या जामखेड बीड रोडवर अज्ञात वहाणाच्या धडकेने कोल्ह्याचा मृत्यू

जामखेड बीड रोडवर अज्ञात वहाणाच्या धडकेने कोल्ह्याचा मृत्यू


जामखेड बीड रोडवर अज्ञात वहाणाच्या धडकेने कोल्ह्याचा मृत्यू

जामखेड शहर प्रतिनिधी

जामखेड जवळील बीड रोडवरील मोहा शिवारात अज्ञात वहाणाच्या धडकेने एका कोल्ह्याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनपाल रविंद्र राठोड, वनरक्षक नागेश तेलंगे शांतीलाल सपकाळ शामराव डोंगरे वनसेवक भाऊसाहेब भोगल यांनी धाव घेतली. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता मोटेगावकर यांनी देखील त्याच्यावर उपचार केले मात्र उपचारादरम्यान या कोल्ह्याचा मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की सोमवार दि ३० मार्च रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जामखेड बीड रोडवरील मोहा परीसरात एक कोल्हा हा रस्ता ओलांडत होता. मात्र याच दरम्यान एका अज्ञात वहानाने त्यास धडक दिली. या आपघातात कोल्हा जखमी झाला घटनेची माहिती वनविभाच्या कर्मचाऱ्यांना समजताच वनपाल रविंद्र राठोड, वनरक्षक नागेश तेलंगे, शांतीलाल सपकाळ शामराव डोंगरे व वनसेवक भाऊसाहेब भोगल यांनी धाव घेतली. यावेळी कोल्हा हा गंभीर जखमी होता. यानंतर पंचायत समिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता मोटेगावकर यांनी सदर कोल्यावर जाग्यावरच उपचार केले. यानंतर वनविभाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याला ठेवण्यात आले होते मात्र रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसर्‍या दिवशी सकाळी वनविभाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर मोहा परिसरात अंत्यसंस्कार केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!