

हळगाव कारखाना कर्जत जामखेड च्या शेतकर्यांचा जिवनदायनी ठरणार-सुरेश भोसले
बारामती ॲग्रो जय श्रीराम शुगर युनियन नंबर तीनचा गळीत हंगामाची शुभारंभ संपन्न
जामखेड प्रतिनिधी
गेल्या तेरा वर्षात शेतकर्यांचा विश्वास व पुढाऱ्यांचे सहकार्याने हळगाव साखर कारखाना वाटचाल करत होता. मात्र आ.रोहित पवार यांच्या बारामती ऑग्रोने घेतला आहे. आता शेतकर्यांच्या उसाला चांगला भाव मिळणार आहे. लवकरच बारामती ऑग्रो लि. जय श्रीराम शुगर युनियन नंबर तीन हा कारखाना कर्जत जामखेड च्या शेतकर्यांनसाठी जीवनदायिनी ठरणार आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी व्यक्त केले.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर कारखाना यूनिट ३ चा ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हस्ते मोळी टाकुन शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी जय श्रीराम बारामती ॲग्रो शुगर युनिट 3 हाळगाव या साखर कारखान्याच्या मोळी पुजन कार्यक्रमाच्या मान्यवराची वेळी उपस्थिती कारखान्याचे व्हा चेअरमन गुळवे आबा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा मधुकर (आबा) राळेभात, सी ओ.ओ. प्रकाश जठार ,
व्हाईस प्रेसिडेंट मिलिंद देशमुख , कीसन निबे, शेतकीय अधिकारी मधुकर मोहिते, बालाजी प्रभत, संतोष मगर, उस पुरवठा अधिकारी मदन लेकुरवाळे सह रा.कॉ पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, माजी सभापती तथा बाजार समितीचे संचालक सुधिर राळेभात, बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट सर, जेष्ठ नेते किसनराव ढवळे, रा कॉ पक्षाचे जेष्ठ नेते दत्तात्रय वारे, माजी सभापती सुर्यकांत मोरे, रा कॉ पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रा राजेंद्र पवार पाटील, रा कॉ पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष शरद शिंदे, मजुर फेडरेशनचे संचालक चंद्रकांत राळेभात, सरपंच सुनिल उबाळे, चेअरमन भारत काकडे, विलास जगदाळे, बाजार समितीचे संचालक सुरेश पवार पाटील, राहुल बेदमुथ्था, सुंदरदास बिरंगळ , गजानन शिंदे, सतिश शिंदे, विठ्ठल चव्हाण, नारायण जायभाय, चेअरमन पांडुरंग ढवळे, जेष्ठ नेते संचालक प्रकाश सदाफुले,रा कॉ पक्षाचे जेष्ठ नेते वैजीनाथ पोले, माजी सरपंच संतोष निगुडे, युवा नेते गाडेकर, बापुसाहेब शिंदे सह शेतकरी उपस्थित होते.

कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात म्हणले की आ. रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तालूक्यात कारखाना नसल्याने बाहेर ऊस देण्यात अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते. योग्य भाव न मिळणे, लांब वाहतुक असल्याने खर्चात वाढ,ऊसतोड टोळ्या न मिळणे, कारखानदाराकडुन वेळेवर बील न मिळणे.अशा त्रासदायक परिस्थितीतून तालुक्यातील शेतकरयांना बाहेर काढून त्यांचा विकास साधण्याचा आ. रोहित पवार यांनी निर्णय घेतला. हळगाव येथील जय श्रीराम शुगर कारखाना सातत्याने पाठपुरावा करून घेतला.

साखर कारखान्याच्या बाबत आ रोहित पवार यांच्या शेतकरी हिताच्या निर्णयाची अडवणूक करण्यासाठी सत्तेच्या जोरावर सरकारकडं कोण हट्ट करतय हे जनतेला माहीत आहे.असे सांगत नाव घेता आ. प्रा राम शिंदे यांच्या विरोधी भुमिकेचा समाचार घेतला. मतदारसंघातील शेतकरयांच्या हिताविरोधी भुमिका ही दूर्दैवी गोष्ट आहे.
आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती ॲग्रो जय श्रीराम शुगर कारखाना यूनिट ३ शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेत अहमदनगर जिल्ह्यात अग्रेसर राहील असे मत बारामती ॲग्रो जय श्रीराम शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आबा गुळवे यांनी केले.


Post Views: 20
error: Content is protected !!