

विद्यार्थींनी घेतला दुसर्या शाळेत प्रवेश, जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने केली आत्महत्या, चिठ्ठीत लिहिला घटनाक्रम…
दौंड : शिक्षक हा समाज घडवण्याचं, पिढी घडवण्याचं काम करत असतो. अनेकदा अनेक शिक्षक तळमळीने शिकवतही असतात. मात्र अशा शिक्षकांबाबत कधीकधी मन सून्न करणाऱ्या बातम्याही समोर येतात. अशीच एक वाईट बातमी पुण्यातल्या दौंड तालुक्यात घडला आहे. विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने जिल्हा परिषद शिक्षकाने आत्महत्या केली.

दौंड तालुक्यात असलेल्या जावजी बुवाची वाडी या ठिकाणी ही घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन महिन्यांपूर्वी अरविंद देवकर यांची बदली झाली होती. मात्र विद्यार्थी शाळा सोडून गेले. ही बाब अरविंद देवकर यांच्या मनाला इतकी लागली की तणनाशक पिऊन अरविंद देवकर यांनी आयुष्य संपवलं. दोन महिन्यांपूर्वीच अरविंद देवकर यांची बदली झाली आहे.

गावातील छोट्याश्या शाळेची दुरवस्था पाहून अरविंद यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेतल. त्यानंतर त्यांच्या मदतीने शाळा स्वच्छ करुन घेतली. श्रमदान आणि इतर गोष्टींचंही महत्त्व या माध्यमातून मुलांना पटवून देण्याचा अरविंद यांचा हेतू होता. मात्र अरविंद देवकर यांचा हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पालकांना पटला नाही.

पालकांनी शाळेत येऊन गोंधळ घातला आणि मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये हलवलं. शाळेतील सर्व १० विद्यार्थी ही शाळा सोडून गेल्याने अरविंद देवकर यांचं मानसिक खच्चिकरण झालं. चांगलं काहीतरी करण्याच्या हेतूने केलेल्या कृतीमुळे सर्वच विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने त्यांनी तणनाशक औषधाचं सेवन करुन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
अरविंद यांनी आत्महत्येपूर्वी एक चिट्ठीदेखील लिहिली आहे. पूर्वीच्या कार्यकाळामध्ये आपल्याला चांगले सहकारी लाभले होते असा उल्लेख या चिठ्ठीत आहे. आत्महत्येपूर्वी अरविंद यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख त्यांनी सविस्तरपणे केला आहे. आपली नियुक्ती मे महिन्यामध्ये झाली होती. त्यानंतर नेमके काय काय घडले आणि शाळेतील विद्यार्थ्यांकडून आपण काम करुन घेतल्याने पालक नाराज झाले यासंदर्भातील तपशीलही अरविंद यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. अरविंद यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनादेखील मोठा धक्का बसला आहे.


Post Views: 16
error: Content is protected !!