जामखेड प्रतिनिधी
दोन्ही हात आणि तिसरे मस्तक सदैव भगवंतांच्या चरणी लीन असावे. भगवंतांचे नामस्मरण करावे, त्याला नमन करावे. असे नाना महाराजांनी सांगितले आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली, समूळ विलया l संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती l अशा संतांचा महिमा वर्णन करणाऱ्या अभंगाचे निरूपण बाल किर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वरी दिदी सोनटक्के यांनी केले.
तीर्थक्षेत्र महादेव मंदिर देवस्थान व ज्ञानेश्वर सेवा संस्थान भवरवाडी ता. जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ह. भ. प. कांता ताई (माई साहेब) सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली चक्री किर्तनाचे पाहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, मी माझ्या माहेराला जाईल म्हणजेच पंढरपूरला जाईल. आणि तेथे माझ्या माता पित्याला भेटेल. म्हणजेच विठ्ठल रखुमाई ला भेटेल आणि माझा संसार सुखाचा करील. अवघा ची संसार सुखाचा करील | आनंदे भरीन तिन्ही लोका l जाईन गे माय पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या l या अभंगावर बाल कीर्तनकार ह.भ.प. वैष्णवी दिदी सोनटक्के यांनी समर्पक निरूपण केले. त्यांना मृदंगावर योगेश महाराज क्षिरसागर व रितेश महाराज सुरवसे यांनी तर विठ्ठल जाधव, गणेश दौंड, रत्ना ताई सुतार व मंथन ताई ठाकर यांनी गायन साथ केली. कीर्तनास भवरवाडी पंचक्रोशीतील महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







