Home क्राईम न्यूज बावी येथे चोरट्यांनी घरफोडी करून केला ७२ हजारांचा ऐवज लंपास

बावी येथे चोरट्यांनी घरफोडी करून केला ७२ हजारांचा ऐवज लंपास

बावी येथे चोरट्यांनी घरफोडी करून केला ७२ हजारांचा ऐवज लंपास

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील बावी या येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांन मध्ये सोन्याच्या दागिन्यांचनसह रोख रक्कम असा ७२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला केला आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फीर्यादी अभिजीत भास्कर निकम हे दि ११ रोजी रात्री घराचे दार लोटुन आतील बेडरुम मध्ये झोपले होते. तर त्यांचे आई वडील घराच्या पडवीत झोपले होते. यानंतर दि १२ रोजी फीर्यादी यांची आई पहाटे साडेचार वाजता झोपेतुन उठली यावेळी त्यांच्या घरात चोरी झाली असल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्याने घरातील लोखंडी कपाट व किचन मधिल धान्याच्या डब्यातील उचकापाचक केलेली दिसली. डब्यात ठेवलेले गंठण, बोरमाळ व कानातील दागिने असे ६२ हजार रु दागिने व रोख रक्कम १० हजार असा एकुण ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी अभिजीत भास्कर निकम यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर याच दिवशी बावी गावात दुसर्‍या ठिकाणी अभिमान मोहन पवार यांच्या घरी देखील अज्ञात चोरट्याने डाव साधत त्यांच्या घरातील सोन्याचा ऐवज लंपास केला या प्रकरणी फीर्याद दाखल करण्याचे काम सुरू आहे. मागिल पंधरा दिवसांपुर्वीच म्हणजे दि २५ मार्च रोजी जामखेड तालुक्यातील वाघा येथे मध्यरात्रीच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ९६ हजारांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. सध्या ग्रामिण भागात वाढत असलेल्या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करवा अशी मागणी ग्रामस्थांन कडुन होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!