जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील प्रसिद्ध असलेले भव्य कपड्याचे दालन विजय कलेक्शन च्या वतीने गणेशोत्सवा निमित्त जामखेडच्या पत्रकारांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.

आरतीसाठी विजय कलेक्शन चे संचालक विजयशेठ कोठारी यांनी निमंत्रित केले होते. अतिथी देवो भव या नुसार जामखेड तालुका मिडिया क्लब चे अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, सहसचिव, संपर्क प्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ओंकार दळवी यांच्या सह पदाधिकारी व सदस्य आदी पत्रकार बांधवाचा सत्कार करण्यात आला.

मिडिया क्लब चे कार्याध्यक्ष जेष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी विजयशेठ कोठारी म्हणाले, पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. ते समाजाचा आरसा असून दररोज च्या घडामोडी प्रमाणिक पणे देत असतात. समाजामध्ये विविध विषयावर वाचा फोडण्याचे काम पत्रकार करतात. आज श्री गणेशाची आरती पत्रकार बांधवाच्या हस्ते करण्याचा माझा संकल्प होता. तो पूर्ण झाल्याने समाधान वाटते.

यावेळी दुकानाचे संचालक विजय शेठ कोठारी, अजयशेठ कोठारी,जामखेड तालुका मिडिया क्लब चे अध्यक्ष सुदाम वराट, उपाध्यक्ष अशोक वीर, सचिव सत्तारभाई शेख,सहसचिव पप्पुभाई सय्यद,अविनाश बोधले, संपर्क प्रमुख धनराज पवार,सदस्य अजय अवसरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ओंकार दळवी, बुवासाहेब मुळे,चेतन राळेभात, चिन्मय राजगुरु आदी उपस्थित होते.

Post Views: 22
error: Content is protected !!