झोका खेळताना काळजी घ्या! एक चूक आणि जळगावातील मुलाचा जागीच मृत्यू

जळगाव : घरात लहान मूल असेल तर पालकांना विशेष काळजी घ्यावी लागती. अनेकदा लहान मुलं खेळण्याच्या नादात असं काही करतात की त्यांना आपला जीव गमवावा लागतो.

त्यामुळे घरात लहान मुलं असतील तर पालकांना त्यांच्या प्रत्येक हाचलाचीवर लक्ष द्यावं लागतं. मात्र, तरीही अनेकदा मोठ्या दुर्घटना घडतात. जळगावमधून सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

शहरातील मुंदडा नगर 1 मधील 15 वर्षीय बालकाचा झोका खेळत असताना मृत्यू झाला. झोका खेळत असताना फाशी लागून या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेदांत संदीप पाटील असं या बालकाचं नाव आहे. वेदांतचे आई आणि वडील दोघंही शिक्षक आहेत.

शहरातील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल इथे नववीत हा मुलगा शिकत होता. घटना घडल्यानंतर त्याला त्वरित अमळनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी वेदांतला मृत घोषित केलं. या घटनेनंतर वेदांतचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवनिच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.

पुण्यात दाम्पत्याचा करुण अंत

पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातही काही दिवसांपूर्वी मन हेलावून टाकणारी घटना घडली. सहा महिन्यांपूर्वीच लह्न झालेल्या जोडप्याचा या घटनेत करुण अंत झाला. पाण्यात बुडाल्यानं पती-पत्नीचा शेवट झाला. जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर या आदिवासी भागात ही घटना घडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here