
जीवो फायबर हायस्पिड इंटरनेट सेवा मुळे जागतिक स्तरावरील ज्ञान पोहोचवण्याचे काम होणार सोपे -पो.नि महेश पाटील
जीवो फायबर सेवा जामखेड शहरात सुरु, एकाच वेळी मिळणार टीव्ही बरोबरच इंटरनेट सुविधा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड सारख्या ठिकाणी बदलत्या काळानुसार विश्वदर्शन नेटवर्कच्या माध्यमातून जीवो फायबर हायस्पिड इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता चांगल्या दर्जाचे नेटवर्क मिळणार आहे. या जीवो फायबर हायस्पिड इंटरनेट सेवा मुळे जागतिक स्तरावरील ज्ञान पोहोचवण्याचे काम आनखी सोपे होणार आहे आसे मत जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक
महेश पाटील यांनी व्यक्त केले.
बहुचर्चित आसलेल्या रीलायन्स जीवो कंपनीची जिओ फायबर हायस्पिड इंटरनेट सेवा ही दि २८ फेब्रुवारी पासुन जामखेड शहरामध्ये सुरू झाली आहे. याचे उद्घाटन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, जिओचे विजय गोसावी साहेब, डॉ. सुरेश काशीद, विश्वादर्शनचे संचालक गुलाब जांभळे व पोपट (नाना) राळेभात, बंडू म्हेत्रे, डॉ. ओम जांभळे, पत्रकार नासिर पठाण, मोहहीदिन तांबोळी, किरण रेडे, अशोक वीर, संजय वारभोग, अविनाश बोधले, पप्पूभाई सय्यद, अजय अवसरे, अरुण हिंगणे, अनिल म्हेत्रे, आदित्य जांभळे, प्रदीप महारनवर, तेजस सातपुते, सुमित ओहोळ सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बहुचर्चित आसलेल्या रीलायन्स जीवो कंपनीची जिओ फायबर हायस्पिड इंटरनेट सेवा ही दि २८ फेब्रुवारी पासुन जामखेड शहरामध्ये सुरू झाली आहे. याचे अधिकृत पार्टनर विश्वदर्शन केबल टीव्हीच्या मार्फत सर्व ठीकाणी विस्तारीत करण्यात आली आहे. यामध्ये गरजे नुसार हायस्पिड इंटरनेट, ओटीटी प्लॅटफॉर्म, अनलिमिटेड चॅनल आणि व्हिडिओ, ऑन डीमांड आणि टीव्ही समोर ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्स सेवा, तसेच अनलिमिटेड फोन कॉल सेवा देण्यात येणार आहे. ही सेवा विना खंडीत चालणार आहे तसेच ग्राहकांना आता हायस्पिड इंटरनेट मिळणार आहे त्यामुळे त्यांची इंटरनेटच्या माध्यमातून होणारी सर्व कामे सोपी होणार आहेत आसे कंपनीचे मॅनेजर विजय गोसावी यांनी दिली आहे.


Post Views: 12
error: Content is protected !!