जामखेड शहरात स्टार हेल्थ ग्रृपच्या वतीने आरोग्य विमा जनजागृती रॅली काढण्यात आली

जामखेड प्रतिनिधी

स्वातंत्र दिनाच्या औचीत्य साधुन, हर घर तिरंगा, हर घर स्टार हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विमा असा नारा देत सर्व स्टार हेल्थच्या प्रतिनिधींनी जामखेड शहरात मोटरसायकल वरून घरोघरी फीरुन मोटारसायकलची आरोग्य विमा जनजागृती रॅली रॅली काढण्यात आली.

जामखेड शहरात स्टार हेल्थ इन्शुरन्स (आरोग्य विमा प्रतिनिधी) संतोष डहाळे सर ग्रृप यांच्या वतीने जामखेड शहरात आज आरोग्य विमा जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यामध्ये जामखेडचे तहसीलदार पाडळे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र दिनाच्या औचीत्य साधुन हर घर तिरंगा, हर घर स्टार हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विमा असा नारा देत सर्व प्रतिनिधींनी शहरात मोटरसायकल वरून घरोघरी जाऊन मोटरसायकल ची रॅली काढली. तसेच आरोग्य विमाचे महत्त्व समजावून सांगितले. प्रत्येक कुटुंबाच आरोग्य महत्त्वाचे व का गरजेचे आहे हे सांगीतले सध्या वैद्यकीय खर्च गगनाला भिडला असता सर्वांनी आरोग्य बाबतीत जागरूक होऊन आपला आरोग्य विमा घेतला पाहिजे. स्टार हेल्थ इन्शुरन्स कार्यालया समोर रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी सेल्स मॅनेजर संतोष डहाळे , विनायक राऊत, अरुण उगले, विजय पवार, जगताप सर हुंबे सर, सौरव पवार, विजय कोकाटे, संदीप भालेराव खटावकर सर, महेश आजबे, नितीन मैड, इमरान पठाण, गुरुदेव, संतोष घोलप, विठ्दल नेटके,जयसिंग पवार व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक विनायक राऊत तर अरुण उगले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here