

जामखेड येथे सकल जैन समाजाच्या वतीने पं. पु. आनंदऋषी महाराज यांची १२३ वी जयंती साजरी
जामखेड प्रतिनिधी
पं. पु. आनंदऋषी महाराज यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त जामखेड शहरात सकल जैन समाजाच्या वतीने नुकतेच जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी तीन वाजता जामखेड शहरतुन महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सकल जैन समाजातील महिला पुरूष व लहान मुलांनी मोठा सहभाग नोंदविला होता.

प. पु. आनंदऋषी महाराज यांनी दिलेली शिकवण व समाजासाठी केलेले प्रबोधन या संदर्भातील संदेश समाजाला कळावा अशा स्वरूपाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या मिरवणुकीचा समारोप महावीर भवन याठिकाणी झाला यावेळी गुरू महाराजांवरील गितांचा संगीत भजन संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या जयंती उत्सवासाठी आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावत उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या या वेळी बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की पं. पु. आनंदऋषी महाराज यांनी जगाला शांततेचा संदेश दिला आहे तसेच महापुरुषांची जयंती साजरी करण्याच्या पाठीमागे एक प्रेरणा आसते ती साजरी करताना अध्यात्मिक धार्मिक मिरवणूक काढावी तसेच आपल्या गुरूंचे विचार अजरामर रहावेत व पुढची पिढी प्रेरीत व्हावी आणि यासाठीचे संस्कार हे बाल वयातच झाले पाहिजेत हे संस्कार जिवनात आपल्या यशाचे शिखर गाठण्यासाठी बळ देत आसतात तसेच गुरू होणं हे सोपं कार्य नाही त्यासाठी त्याग संघर्ष व तपस्या करावी लागते त्याच वेळी एखादी व्यक्ती गुरुपदा पर्यंत पोहचती आसे सांगितले.

यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात, सरपंच बापूसाहेब कार्ले, रमेश आजबे, जैन श्रावक संघाचे शांतीलाल गुगळे, मनसुखलाल गांधी, दिलीप बाफना, अमृतशेठ बेदमुथ्था, आकाश बाफना, कुंदनशेठ भंडारी, आसराज बोथरा, माजी सरपंच सुनील कोठारी, अशोक पितळे, हिरालाल शेठ गुंदेचा, नवनीत बोरा, चंदूला बेदमुथ्था, शरद शिंगवी, प्रविण चोरडिया, समाजसेवक अभय शिंगवी, महावीर बाफना, कांतीलाल बोथरा, गौतम दादा बाफना, महेश कटारिया, राहुल बेदमुथा, बाळासाहेब पारख, नितीन पारख, सुशिला बेदमुथा, अशोक बाफना, योगेश भंडारी, नितीन सोळंकी, प्रफुल्ल सोळंकी, मंगेश बेदमुथा, तुषार बोरा, प्रशांत बेदमुथ्था आदींसह सकल जैन समाज बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Post Views: 20
error: Content is protected !!