जामखेड तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या पाच हजार बहीणींच्या बँक खात्याला आधार लिंक नाही
जामखेड प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेल्या जामखेड तालुक्यातील 5 हजार 126 महिलांचे बँक खाते आधार लिंक नसल्याने या महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पासुन महीलांनी आपले बँक खाते आधार लिंक करण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी केली आहे. तातडीने बँकेकडून बँक खात्याला आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी आशी मागणी महीलांनकडुन होत आहे.
अडथळ्यांची शर्यत पार करुन दि 16 ऑगस्ट 2024 रोजी जामखेड तालुक्यातील एकुण 34 हजार 805 महीलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरले आहेत. यामध्ये 108 अर्ज बाद झाले असुन 362 अर्ज नामंजूर आहेत तर 29 हजार 129 अर्ज मंजुर झाले आहेत. मात्र आकडेवारी मध्ये दररोज बदल होत असल्याने हे आकडे आनखी वाढणार आहेत आशी माहिती विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती सदस्य व महीला व बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर यांनी दिली आहे.
मागिल तीन दिवसान पासुन महीलांच्या खात्यावर दोन महीन्याचे तीन हजार रुपये जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे महीलांच्या चेहर्यावर आनंद दिसुन येत असला तरी मात्र मिळालेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील 5 हजार 126 महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्याने या महीलांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा महिलांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन मेसेज आल्यामुळे त्यांनी खाते लिंक करण्यासाठी जामखेड व खर्डा येथील बँकानमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
गर्दीमुळे काही बँकांनी या महीलांचे अर्ज व आधार कार्ड झेरॉक्स जमा करून घेतल्या आहेत मात्र जमा केलेल्या अर्जाच्या अनुशंगाने अर्तातडीने बँक खाते हे आधार कार्ड ला जोडण्यात यावे. तसेच बँकेकडून खाते आधार लिंक झाल्यावर लवकरात लवकर या योजनेचे पैसे शासनाने महीलांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणी महीलांनकडुन होत आहे.