जामखेड प्रतिनिधी
अन्नधान्यावर जीएसटी लावण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आज जामखेड तालुक्यातील सर्व अन्य धान्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी बंद पाळला.
केंद्र सरकारने अन्नधान्यावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय जाहीर केला असून 18 जुलैपासून तो लागू करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयास राज्यातील सर्व धान्य विक्रेत्या व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय लागू करू नये अशी मागणी सर्व व्यापारी संघटनांनी केले आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आज एक दिवसाचा देशव्यापी लाक्षणिक बंद सर्व व्यापाऱ्यांनी ठेवला होता. या आवाहनास सर्वांनी प्रतिसाद देऊन आज शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड मध्ये असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांनी जीएसटीच्या निर्णयाच्या विरोधात कडकडीत बंद पाळला.

केंद्र सरकारने अन्नधान्यावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा जो निर्णय घेतला आहे हा अन्यायकारक असून तो तातडीने रद्द करावा अशा मागणीचे निवेदन जामखेड व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुशील बेदमुथ्था, सचिव मारुती काळदाते व खजिनदार संजय टेकाळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना याबाबत निवेदन देऊन जीएसटी रद्द करावी अशी मागणी केली आहे. याप्रसंगी भरत पाटील शिंदे, संतोष बोरा, कांतीलाल जरे ,रमेश जरे, सुभाष भंडारी, त्रिंबक कुमटकर,भागवत पवार आदी व्यापारी उपस्थित होते.






