रोखठोक जामखेड…..

सौताडा येथील रामेश्वर धबधब्यात आष्टी तालुक्यातील एकाचा मृतदेह सापडला आहे. सदर मृतदेह सडलेल्या अवस्थेत अढळुन आला आहे. दोन तीन दिवसापूर्वी धबधब्यावरून उडी मारलेली असावी असा प्राथमिक अंदाज असून पाटोदा पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सौताडा येथील धबधब्यात सापडलेल्या मृताची ओळख पटलेली असून मृत असलेले इसमाचे वय, वर्ष 34 असून तो आष्टी तालुक्यातील केरुळ येथील अंधळे वस्ती येथील आहे. मयत इसम हे सध्या एस टी महामंडळ मध्ये मुंबई येथे कार्यरत होते. नेमकी ही आत्महत्या आहे की हत्या? अशी चर्चा सुरू आहे. रामेश्वर हे पर्यटन स्थळ संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले असून येथील निसर्गरम्य धबधबा श्री क्षेत्र रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक रोज ये-जा करतात. काल दि 8 मार्च रोजी दुपारच्या सुमारास सौताडा येथील फोटोग्राफर प्रशांत घुले, वनखात्यातील वनरक्षक भाऊसाहेब पेचे व नवनाथ उबाळे हे नेहमी प्रमाणे जंगलात गस्त घालत असताना त्यांना
धबधब्याजवळ दगडा मध्ये अज्ञात मृतदेह पाहावयास मिळाला. त्यांनी तात्काळ पाटोदा पोलिसांना संपर्क करून माहिती दिली. पाटोदा पोलीस स्टेशन चे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल तांदळे व तांबे पुढील तपास करीत आहेत.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here